Social Media Regulation

१३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया खाते आता पालकांच्या संमतीशिवाय नाही; ‘शील्ड’ विधेयकात कडक तरतुदी

लहान मुलांच्या वाढत्या डिजिटल वापरामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

१३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया खाते आता पालकांच्या संमतीशिवाय नाही; ‘शील्ड’ विधेयकात कडक तरतुदी

मुलांच्या डेटावर, ऑनलाइन ट्रॅकिंग आणि Targeted Ads वर निर्बंध; नियमभंग करणाऱ्या प्लॅटफॉर्मना १० कोटींपर्यंत दंड

लहान मुलांच्या वाढत्या डिजिटल वापरामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मवरील मुलांच्या वापरासाठी कठोर नियम प्रस्तावित करण्यात आले आहेत. १३ वर्षांखालील मुलांना पालकांची स्पष्ट तसेच पडताळलेली डिजिटल संमती नसल्यास सोशल मीडिया खाते उघडता येणार नाही, अशी तरतूद प्रस्तावित ‘शील्ड’ विधेयकात करण्यात आली आहे.

या विधेयकानुसार, १३ वर्षांखालील मुलांसाठी खाते तयार करण्यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना पालकांची डिजिटल मंजुरी घेणे आवश्यक ठरणार आहे. मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसोबतच त्यांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यावरही या प्रस्तावात भर देण्यात आला आहे. मुलांचा डेटा गोळा करणे, त्यांच्या ऑनलाइन हालचालींचे Tracking करणे, त्यांचे प्रोफाईल तयार करणे तसेच त्यांना Targeted Ads दाखवणे यावर बंदी घालण्याची तरतूद आहे.

प्रस्तावित कायद्यानुसार १८ वर्षांखालील सर्व व्यक्तींना ‘मूल’ मानले जाणार आहे. १३ वर्षांखालील मुलांना पालकांच्या Verified Consent शिवाय सोशल मीडिया किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर खाते उघडता येणार नाही. तसेच मुलांना अश्लील साहित्य, ऑनलाइन जुगार किंवा सट्टेबाजी, हिंसाचार, प्रक्षोभक कंटेंट आणि अमली पदार्थांशी संबंधित सामग्रीपासून दूर ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंपन्यांवर राहणार आहे.

मुलांचे वय निश्चित करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सना मजबूत Age Verification यंत्रणा उभारणे बंधनकारक असेल. याशिवाय पालकांसाठी Dashboard उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्याद्वारे पालकांना मुलांचा Screen Time नियंत्रित करता येईल तसेच Privacy Settings व्यवस्थापित करता येतील.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या Tech Companies वर आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. प्रस्तावित कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर १० कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. वारंवार किंवा हेतुपुरस्सर उल्लंघन झाल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९अ अंतर्गत संबंधित सेवा तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

भाजप खासदार बैजयंत पांडा यांनी मांडलेले हे विधेयक शुक्रवारी संसदेत सादर होणाऱ्या दोन खासगी विधेयकांपैकी एक होते. मात्र, संसदेचे कामकाज तहकूब झाल्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकली नाही. दुसरे विधेयक Deepfakes तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) होणारा गैरवापर रोखण्यासंदर्भात होते.

खासगी विधेयकांचे कायद्यात रूपांतर होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत संसदेने अशी केवळ १० ते १२, म्हणजेच सुमारे एक डझन विधेयके मंजूर केली आहेत. त्यामुळे ‘शील्ड’ विधेयकाच्या पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

सोशल मीडिया वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी नवे नियम? सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले महत्त्वाचे निर्देश

सोशल मीडिया वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी नवे नियम? सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले महत्त्वाचे निर्देश

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला कायदेशीर सुरक्षाव्यवस्थेचा विचार करण्यास सांगितले. पालकांची संमती आणि वय पडताळणीचा मुद्दा चर्चेत आहे.

Sep 29, 2026
उन्हाळ्याची सुट्टी मुलांसाठी ‘क्लासेस’पेक्षा अनुभवांची संधी ठरू द्या!

उन्हाळ्याची सुट्टी मुलांसाठी ‘क्लासेस’पेक्षा अनुभवांची संधी ठरू द्या!

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांना सतत क्लासेसमध्ये व्यस्त ठेवण्याचा काळ नव्हे. पालकांनी मुलांसोबत वेळ घालवून त्यांना अनुभव, मोकळा वेळ, सर्जनशीलता आणि जीवनकौशल्ये शिकण्याची संधी द्यावी.

Sep 09, 2026
रात्री Instagram-Facebook होणार बंद! अल्पवयीनांसाठी Metaचे नवे कडक नियम

रात्री Instagram-Facebook होणार बंद! अल्पवयीनांसाठी Metaचे नवे कडक नियम

सोशल मीडियाच्या अतिवापराचा लहान मुले आणि किशोरवयीनांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता मेटाने Instagram आणि Facebook संदर्भात कठोर नियम लागू करण्याची तयारी केली आहे.

Aug 29, 2026
मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

Social Media Ban: मुलांच्या मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने १६ वर्षांखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे

Aug 24, 2026
मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

मोठा निर्णय...आता 16 वर्षांखालील मुलांना 'सोशल मीडिया' वापरावर बंदी

Social Media Ban: मुलांच्या मानसिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने 16 वर्षांखालील मुलांच्या समाजमाध्यम वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

Aug 24, 2026