औंढा नागनाथ मंदिर

ज्योतिर्लिंग औंढा नागनाथच्या कायापालटा साठी 700 कोटी; जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी 

Aundha Nagnath Temple : हिंगोलीतील ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिराच्या कायापालटासाठी 700 कोटी रुपये मंजूर. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कामाची पाहणी केली

ज्योतिर्लिंग औंढा नागनाथच्या कायापालटा साठी 700 कोटी; जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी 

Aundha Nagnath Temple

हिंगोली (Aundha Nagnath Temple) : विश्वप्रसिद्ध आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या 700 कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्याच्या कामाला आता वेग येणार आहे. या नियोजित विकासकामां साठी निश्चित केलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज केली. मंदिर परिसरातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला गती देण्याच्या सूचना केल्या.

कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या विशेष पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून (Aundha Nagnath Temple) औंढा ज्योतिर्लिंगासाठी 700 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून मंदिर परिसराचे जागतिक दर्जाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून भाविकांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे देश-विदेशातील भाविकांना सुलभ दर्शनाबरोबरच चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुजय देशमुख, उपअभियंता कलटवार तसेच औंढ्याचे तहसीलदार गाडे उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसराचे पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित राखून भाविकांना सुलभ दर्शन घेता येईल अशा पद्धतीने आराखड्याची अंमलबजावणी करण्यावर चर्चा करण्यात आली. मंदिराच्या मूळ वास्तूला धक्का न लावता विकासकामे करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष वेरूळकर आणि शासकीय कंत्राटदार संदीप बांगर यांनी उपस्थित राहून विकासकामांच्या तांत्रिक बाजूंची माहिती अधिकाऱ्यांना दिली. आमदार बांगर यांनी मंजूर करून आणलेला निधी आणि प्रत्यक्षातील जागा यांचा समन्वय साधून कामाचा नकाशा अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला.

यावेळी औंढा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंजूर विकास आराखड्यामध्ये अद्ययावत भक्त निवास, प्रशस्त वाहनतळ, दर्शन रांगेचे योग्य व्यवस्थापन आणि संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल अशी चिन्हे दिसत असून, यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित सामग्री

लोकशाहीची मूल्ये जपणे आणि अराजकतेला प्रत्युत्तर देणे ही काळाची गरज : सुनील राणे

लोकशाहीची मूल्ये जपणे आणि अराजकतेला प्रत्युत्तर देणे ही काळाची गरज : सुनील राणे

Hingoli Bharatiya Janata Party: लोकशाहीची मूल्ये जपणे, अराजकतेच्या प्रवृत्तींना ठामपणे प्रत्युत्तर देणे आणि केंद्र सरकारच्या विकासाभिमुख कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज..

Nov 14, 2026
हिंगोलीच्या बाजार समितीत हळदीला २३ हजार  रुपयांचा विक्रमी भाव

हिंगोलीच्या बाजार समितीत हळदीला २३ हजार  रुपयांचा विक्रमी भाव

Hingoli Bazar Samiti: संत नामदेव मार्केट यार्ड मध्ये दिवाळीच्या सुट्या नंतर सुरु झालेल्या मोंढ्यात पहिल्या दिवशी हळदीला २२ हजार ६०० रुपये तर दुसऱ्या दिवशी हळदीला २३ हजार २०० रुपये क्विंटलचा भाव..

Nov 13, 2026
हिंगोलीतील जलेश्वर तलावालगतच्या बेघर अतिक्रमण धारकांच्या पुर्नवसनाचा ठराव पारीत

हिंगोलीतील जलेश्वर तलावालगतच्या बेघर अतिक्रमण धारकांच्या पुर्नवसनाचा ठराव पारीत

Hingoli Jaleshwar Lake: मागील काही वर्षापुर्वी हिंगोलीतील जलेश्वर तलावालगतचे अतिक्रमण काढण्यात आले. ज्यामध्ये अनेकजण बेघर झाले. त्यामुळे त्यांच्या पुर्नवसनाचा मुद्दा गाजत असताना हिंगोली नगर पालिका

Nov 13, 2026
हिंगोली जिल्हा परिषदेत शुकशुकाट; दिवाळी संपली तरी अधिकारी-कर्मचारी बेपत्ता 

हिंगोली जिल्हा परिषदेत शुकशुकाट; दिवाळी संपली तरी अधिकारी-कर्मचारी बेपत्ता 

Hingoli Zilla Parishad: दिवाळीचा सण संपून बरेच दिवस उलटले असले तरी हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी अद्याप संपली नसल्याचे चित्र 13 नोव्हेंबर रोजी पहायला मिळाले.

Nov 13, 2026
हिंगोली चषक २०२७ अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण

हिंगोली चषक २०२७ अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण

Hingoli Cup 2027: हिंगोलीच्या क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडविण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात येत असलेल्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा – हिंगोली चषक २०२७ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अधिकृत लोगो..

Nov 13, 2026