औंढा नागनाथ/ जवळाबाजार (Asola Shivar dead body) : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी शिवारातून वाहणार्या कॅनॉल मध्ये ५ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेल्या अंजनवाडी येथील धम्मपाल भानुदास घनसावंत वय ३५ वर्षे या व्यक्तीचा कॅनॉलच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरील व्यक्तीचा मृतदेह ६ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ तालुक्यातील असोला शिवारातून वाहणार्या कॅनल मध्ये तरंगताना आढळून आला.
धम्मपाल भानुदास घनसावंत हे ५ मे रोजी सकाळी ११ वाजता कॅनॉल मध्ये पोहण्यासाठी गेला होता. कॅनॉल मध्ये उडी घेतली तसाच तो व्यक्ती पाण्यासोबत वाहून गेला. यानंतर ग्रामस्थ व पोलिसांनी त्याचा शोध घेतला यादरम्यान ६मे रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान धम्मपालचा मृतदेह (Asola Shivar dead body) असोला शिवारात कॅनॉल मध्ये पाण्यात तरंगताना आढळून आला त्यानंतर औंढा नागनाथ पोलिसांना माहिती देताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, जमादार दिलीप नाईक, जमादार माधव सूर्यवंशी, इमरानोद्दीन सिद्दिकी, अंबादास बेले, अमोल चव्हाणयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह कॅनॉलच्या पाण्यामधून बाहेर काढत जवळा बाजार येथे उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला होता.घटने प्रकरणी अद्याप औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. जमादार दिलीप नाईक पुढील तपास करत आहे.
असोला शिवारात आढळला पोहण्यास गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह
Asola Shivar dead body: अंजनवाडीतील धम्मपाल भानुदास घनसावंत हा व्यक्ती पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये गेला असताना वाहून गेला. त्याचा मृतदेह असोला शिवारातील कॅनलमध्ये तरंगताना आढळला.
Asola Shivar dead body
संबंधित सामग्री
आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!
Asola Khurd water shortage: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावातील दोन्ही तलाव आणि कारपा व आसोला खुर्द शिवार
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के
हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.
औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद
Aundha Nagnath Temple closed: औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश
आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.