अमरावती डुकर हल्ला

ज्येष्ठ नागरिकावर डुकराचा प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी 

Amravati Pig Attack: ज्येष्ठ नागरिकावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात संबंधित वृद्ध नागरिक श्री पिंजरकर हे गंभीर जखमी

ज्येष्ठ नागरिकावर डुकराचा प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी 

Amravati Pig Attack

 

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
शहरात बिबटनंतर रान डुकराची दहशत

अमरावती (Amravati Pig Attack) : शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात आज पहाटे एका ज्येष्ठ नागरिकावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात संबंधित वृद्ध नागरिक श्री पिंजरकर हे गंभीर जखमी झाले असून, परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आज दिनांक २४ जून रोजी पहाटे सव्वा पाचच्या वाजताच्या सुमारास आशियाड कॉलनी येथील रहिवासी श्री पिंजरकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. कॉलनीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून अचानक आलेल्या एका रानडुकराने त्यांच्यावर भीषण हल्ला (Amravati Pig Attack) चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, डुकराने श्री पिंजरकर यांच्या संपूर्ण अंगावर ठिकठिकाणी गंभीर चावे घेतले. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांना आपले एक बोटही गमावावे लागले आहे. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेची थरारक दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेची तीव्रता पाहून नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे. 

बिबटनंतर रानडुकराची दहशत:
शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मागील वर्षी बिबटने प्रवेश केला होता तेंव्हा त्या बिबट्याने याच कॉलनीत प्रवेश केला होता. बिबट्या पाठोपाठ नाल्याच्या लगत डुकरांचा संचार असल्याने यावेळी डुकरांची दहशत पसरली आहे. भविष्यात पुन्हा या डुकरांच्या मागावर बिबट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रशासनाला साकडे:
गणपती  मंदिरासमोरील ज्या मोकळ्या जागेतून जनावरे व डुकरांचा वावर होतो, त्या जागेभोवती त्वरित मजबूत संरक्षक भिंत (कंपाउंड वॉल) उभारण्यात यावी.
नाल्यावरून जनावरे थेट कॉलनीत प्रवेश करत असल्याने, या नाल्यावर पूर्णपणे बंदिस्त आरसीसी गटर लाईनचे बांधकाम करण्याची मागणी आशियाड कॉलनीतील नागरिकांनी केली आहे.

सावधगिरी गरजेची:
शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी सकाळ-संध्याकाळ फिरताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Amravati Pig Attack) जनावरांच्या किंवा डुकरांच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता पाहता चालताना सोबत नेहमी काठी किंवा लाकडी दांडा अवश्य ठेवावा. पहाटे अंधार असताना किंवा निर्जन ठिकाणी एकटे फिरणे टाळावे, सोबत इतर नागरिकांना ठेवावे.

संबंधित सामग्री

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविण्याचा अदिती पोहरे यांचा निर्धार

Congress candidate Aditi Rishikesh Pohare: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांची आढावा बैठक

Sep 29, 2026
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीची सुचना आज प्रसिध्द

Amravati Teachers Constituency Election: महाराष्ट्र विधान परिषदेसाठी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून एका सदस्याची निवडणूक घ्यावयाची आहे. यासंबंधीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने नुकतीच केली..

Sep 29, 2026
गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. रेल्वे स्थानकातील CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.

Sep 26, 2026
पवई IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; परीक्षेतील CCTV फुटेज समोर

पवई IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; परीक्षेतील CCTV फुटेज समोर

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे प्रकरणात परीक्षा कक्षातील CCTV फुटेज समोर आले. मोबाईल वापराचा घटनाक्रम आणि पालकांच्या भेदभावाच्या आरोपांमुळे प्रकरण चर्चेत.

Sep 24, 2026