Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी यशवाडी दुर्घटना

परभणीत पालकमंत्र्यांनी दिली यशवाडी दुर्घटनास्थळी भेट

Parbhani Yashwadi Accident: यशवाडी येथील हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सभागृहाचा छत कसला गेला. यात पाच नागरिकांचा भयानक मृत्यू झाला तर २०हून अधिक जखमीचे झाले.


परभणीत पालकमंत्र्यांनी दिली यशवाडी दुर्घटनास्थळी भेट

Parbhani Yashwadi Accident |

 

जखमींची विचारपुस, मृतांच्या कुटूंबियांचे केले सांत्वन ; प्रशासनाला तत्पर उपचाराचे निर्देश 

परभणी (Parbhani Yashwadi Accident) : यशवाडी  येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून करण्यात आलेल्या बचाव व मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी नागरिकांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपचारांबाबत डॉक्टर आणि प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली.

जखमींना कोणत्याही प्रकारचा विलंब न होता तातडीने आणि सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. या (Parbhani Yashwadi Accident) दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी प्रभावित कुटुंबियांसोबत शासन व प्रशासन ठामपणे उभे आहे. सर्व नागरिकांनी अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे आणि गरज भासल्यास केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांनी केले आहे. 

चिमुकल्या धनंजयच्या नातेवाईकांना धीर
परभणी :
यशवाडी दुर्घटनेत तालुक्यातील कुंभार बाजार येथील धनंजय श्रीकृष्ण बोचरे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदेड येथील यशदा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. पालकमंत्री ना. मेघनाताई बोर्डीकर यांनी धनंजयच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. तसेच उपचारात शासन सर्वतो परी मदत करील, असे आश्वासन दिले. 

जखमींची आ. डॉ.राहुल पाटील यांनी केली विचारपूस
परभणी :
मानवत तालुक्यातील यशवाडी (Parbhani Yashwadi Accident) येथे हनुमान मंदिरात बांधकाम सुरू असलेल्या सभागृहाचे छत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे.२० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींवर परभणी येथील आर.पी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आ.डॉ.राहुल पाटील यांनी हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्म उपस्थित होते. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून घेतली तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून धीर दिला.दुर्घटनेतील जखमींना आवश्यक ते सर्व उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल तसेच पीडितांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिले.