Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा 'राजकीय डाव' फसला ; ॲड. गंगासागर पेदेवाड यांची टीका

​२०२३ मध्ये 'नारीशक्ती वंदन' अभियानांतर्गत महिला आरक्षण विधेयक ऐतिहासिक निर्णयाच्या रूपात संमत झाले होते.


महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा राजकीय डाव फसला  ॲड गंगासागर पेदेवाड यांची टीका

Women Reservation Debate |

नांदेड (Women Reservation Debate) : महिला आरक्षणाच्या आडून संविधान विरोधी कृत्य करण्याचा आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेद्वारे दक्षिणेकडील राज्यांचे अधिकार हिरावून घेण्याचा भाजपचा डाव फसला आहे, अशी घणाघाती टीका नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्या सदस्या ॲड. गंगासागर पेदेवाड (पडलवार) यांनी केली आहे.

​२०२३ मध्ये 'नारीशक्ती वंदन' अभियानांतर्गत महिला आरक्षण विधेयक ऐतिहासिक निर्णयाच्या रूपात संमत झाले होते. १६ एप्रिल २०२६ पासून हे आरक्षण लागू होणे अपेक्षित असताना, भाजपने त्यात जाणीवपूर्वक काही जाचक अटी आणि मुद्दे समाविष्ट करून महिलांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले, असा आरोप ॲड. गंगासागर पेदेवाड यांनी केला.

मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाखाली खासदारांची संख्या वाढवून टॅक्स भरणाऱ्या जनतेवर बोजा टाकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.उत्तर भारतीय राज्यांमध्ये खासदारांची संख्या वाढवून महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी म्हटले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी महिलांच्या समान न्यायासाठी आरक्षणाचे नेहमीच समर्थन केले आहे. मात्र, भाजपने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक रखडवण्याचा प्रयत्न केला, जो त्यांच्याच काही खासदारांनी आणि विरोधकांनी हाणून पाडला.​"भाजपचे हे धोरण म्हणजे 'लबाड घरचे आमंत्रण' असून, आंदोलनाचे ढोंग करणाऱ्या मुखवट्यामागचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे," अशा शब्दांत ॲड. गंगासागर पेदेवाड यांनी भाजपवर निशाणा साधला.