Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर

हिंगोलीत शिंदे शिवसेना गटाच्या महिला आघाडीचे 'थाळी बजाओ' आंदोलन; काँग्रेसचा जाहीर निषेध

आंदोलनाचे नेतृत्व पूर्णपणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले.


हिंगोलीत शिंदे शिवसेना गटाच्या महिला आघाडीचे थाळी बजाओ आंदोलन काँग्रेसचा जाहीर निषेध

Women Reservation Bill |

हिंगोली (Women Reservation Bill) : संसदेत 'नारी शक्ती वंदन' महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने विरोध दर्शवल्याच्या निषेधार्थ, आज हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांनी 'थाळी बजाओ' आंदोलन करत काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध केला.

​या आंदोलनाचे नेतृत्व पूर्णपणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. यावेळी हिंगोलीच्या नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर, कळमनुरीच्या नगराध्यक्षा सौ. आश्लेषा वैभव चौधरी, महिला जिल्हा प्रमुख रेखा देवकते, ज्योती वाघमारे, सुवर्णा गाभणे, सारिका चांदणे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

​महिलांचा अपमान सहन करणार नाही: महिला आघाडीची भूमिका

आंदोलनादरम्यान प्रतिक्रिया व्यक्त करताना पदाधिकारी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नारीशक्तीला सक्षम करण्यासाठी महिला आरक्षण विधेयक मांडले, परंतु काँग्रेसने या विधेयकाविरोधात भूमिका घेऊन देशातील तमाम महिलांचा अपमान केला आहे. या कृत्यामुळे काँग्रेसला आता जनतेत राहण्याचा अधिकार उरलेला नाही.

​आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती

या प्रसंगी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शासन केले जात असे. आज काँग्रेसने आरक्षण नाकारून महिलांचा जो अपमान केला आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो."
​या आंदोलनात गटनेते श्रीराम बांगर, नगरसेवक विशाल गोटरे, कपिल खंडेलवाल, मनोज बांगर, संजय राठोड, अनिल देव यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे अनेक पुरुष पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. महिला आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील, असा पवित्रा यावेळी महिला संघटनेने घेतला.

Related to this topic: