Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरात खळबळ! दिवसाढवळ्या घरात घुसून हत्या

छत्रपती संभाजीनगर येथील साई श्रद्धा पार्क, बजाजनगर येथे एका महिलेने दुसऱ्या महिलेवर घरातच घुसून प्राणघातक हल्ला करत तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


छत्रपती संभाजीनगरात खळबळ दिवसाढवळ्या घरात घुसून हत्या

Woman Attacks Woman |

छत्रपती संभाजीनगर (Woman Attacks Woman) : छत्रपती संभाजीनगर येथील साई श्रद्धा पार्क, बजाजनगर येथे एका महिलेने दुसऱ्या महिलेवर घरातच घुसून प्राणघातक हल्ला करत तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे; त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने पीडितेच्या घरात शिरून धारदार शस्त्र आणि पिस्तूलच्या सहाय्याने तिच्यावर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यामुळे पीडित महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा घटनास्थळीच अंत झाला.

घटनास्थळी पिस्तूल सापडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून, हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत आरोपी महिलेला प्रत्यक्षात पकडले. अटकेदरम्यान झालेल्या झटापटीत आरोपी महिला सौम्य जखमी झाली असून, तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. वैयक्तिक वैमनस्य, सूडभावना किंवा इतर कोणती पार्श्वभूमी यामागे आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेनंतर बजाजनगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस तपास वेगाने सुरू असून पुढील माहिती लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Related to this topic: