Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पाण्यासाठी खासगी टँकरच्याही लागल्या रांगा

शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


पाण्यासाठी खासगी टँकरच्याही लागल्या रांगा

Water Scarcity Hingoli |

हिंगोली शहरात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांची टँकरवर वाढती निर्भरता

हिंगोली (Water Scarcity Hingoli) : शहरात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक भागांतील नागरिक खासगी टँकरच्या माध्यमातून पाण्याची गरज भागवत आहेत. मात्र आता पाण्याच्या स्रोतांवरही ताण वाढल्याने खासगी टँकर चालकांनाही पाणी भरण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत.

हिंगोली शहरात सध्या जवळपास दहा दिवसांच्या अंतराने नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संपूर्ण उन्हाळाभर शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला असून पिण्याच्या आणि घरगुती वापराच्या पाण्यासाठी खासगी टँकर हा पर्याय निवडावा लागत आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या टँकरसाठी ७०० ते ८०० रुपये, तर लहान टँकरसाठी २५० ते ३०० रुपये आकारले जात होते. मात्र उष्णतेची तीव्रता वाढत गेल्याने आणि भूजल पातळी खालावत गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

खासगी टँकर चालकांना पूर्वी ज्या ठिकाणांहून सहज पाणी उपलब्ध होत होते, त्या स्रोतांतील पाणीसाठा कमी झाल्याने आता दूरवरच्या भागांतून पाणी आणावे लागत आहे. यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या डिझेल तुटवड्याचाही परिणाम टँकर व्यवसायावर झाला होता.

सध्या अनेक टँकर चालकांना पाणी भरण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असून विविध ठिकाणी टँकरच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

दरम्यान, शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची तसेच नियमित पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: