Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Water Crisis

कळमनुरी नगरपरिषदेकडून केवळ ६० दिवस पाणीपुरवठा; मात्र वर्षभराची पाणीपट्टी वसुलीचा आरोप

कळमनुरी नगरपरिषदेच्या कारभाराबाबत शहरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभराची पाणीपट्टी वसूल केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.


कळमनुरी नगरपरिषदेकडून केवळ ६० दिवस पाणीपुरवठा मात्र वर्षभराची पाणीपट्टी वसुलीचा आरोप

Water Crisis |

माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांच्या मागणीची नगरविकास विभागाकडून दखल

कळमनुरी (Water Crisis) : कळमनुरी नगरपरिषदेच्या कारभाराबाबत शहरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभराची पाणीपट्टी वसूल केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कळमनुरी शहराला ईसापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याची तक्रार आहे. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा अपेक्षित असताना प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसांनी पाणी येत असल्याने वर्षभरात अवघे सुमारे ६० दिवसच पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून शहरातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला असून, याबाबत विविध स्तरांवर तक्रारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अपुरा पाणीपुरवठा होत असतानाही संपूर्ण वर्षाची पाणीपट्टी वसूल केली जात असल्याने नागरिकांवर दुहेरी अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर कळमनुरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन देऊन, प्रत्यक्ष पाणीपुरवठा झालेल्या दिवसांनुसारच पाणीपट्टी आकारण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

या निवेदनाची नगरविकास विभागाने दखल घेत जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडून अहवाल मागविला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.

या प्रकरणाकडे आता कळमनुरीकरांचे लक्ष लागले असून, नागरिकांना नियमित व नियोजित पाणीपुरवठा कधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Related to this topic: