Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

“धरण उशाला, कोरड घशाला: पाणीटंचाई बैठकीत पत्रकारांना डावलून कागदोपत्री नियोजन; जनता मात्र तहानलेली”

देऊळगाव राजा तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असताना प्रशासनाचा बेफिकीर व संशयास्पद कारभार समोर येत आहे.


“धरण उशाला कोरड घशाला पाणीटंचाई बैठकीत पत्रकारांना डावलून कागदोपत्री नियोजन जनता मात्र तहानलेली”

Water Crisis |

देऊळगाव राजा (Water Crisis) : देऊळगाव राजा तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असताना प्रशासनाचा बेफिकीर व संशयास्पद कारभार समोर येत आहे. पाणीटंचाईसारख्या अत्यंत गंभीर विषयावर झालेल्या आढावा बैठकीत पत्रकारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.

“धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी स्थिती निर्माण झाली असून, संत चोखासागर खडकपूर्णा धरण जवळ असतानाही गावागावांत पाणीटंचाईचा कहर सुरू आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, तर प्रशासन मात्र कागदोपत्री बैठका आणि दिखाऊ नियोजन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत असून, विहिरींच्या पाणीपुरवठ्याची बिले वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे.

दरम्यान, घरकुल प्रकरणातील अनियमितता, अपात्र लाभार्थी आणि ठप्प कामे यामुळे पंचायत समितीचा कारभार पूर्णतः संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी पत्रकारांनाच बैठकीपासून दूर ठेवणे ही लोकशाहीची गळचेपी असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

​​​​​​​

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी गंभीर बनत असून, पाणीअभावी जनतेची अक्षरशः होरपळ होत आहे. तरीही ठोस उपाययोजना न करता केवळ कागदोपत्री बैठका व नियोजन सुरू असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आता तरी प्रशासन जागे होऊन पारदर्शक भूमिका घेणार का, की जनता तहानलेलीच ठेवणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related to this topic: