Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

मुख्याधिकारी अरविंद मुंढे

हिंगोली न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांची वाशिमला बदली

Arvind Mundhe: अरविंद मुंढे यांनी हिंगोलीच्या प्रमुखपदीून वाशिम नगरपालिकेवर पदभार स्वीकारला. त्यांना स्वच्छ भारत आणि शहर सुधारणा या क्षेत्रात काम करण्यात प्रचारित केले आहे.


हिंगोली नप मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांची वाशिमला बदली

Arvind Mundhe |

 

आज स्विकारणार वाशिम न.प. मुख्याधिकारी पदाचा पदभार

हिंगोली (Arvind Mundhe) : नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी हिंगोलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आता त्यांची वाशिम नगर परिषदमध्ये बदली झाली आहे. या संदर्भात १७ जूनला नगर विकास विभागातर्फे शासन आदेश काढण्यात आला आहे. 

हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे (Arvind Mundhe) यांनी २ सप्टेंबर २०२२ मध्ये पदभार स्विकारला होता. पदभार स्विकारल्या पासुनच त्यांनी नागरी सुविधांवर भर दिला होता. २५ जुलै २०२३ रोजी गट  अ मुख्याधिकारी पदी त्यांची पदोन्नती होऊन त्यांना हिंगोली नगर पालिकेमध्येच पदस्थापना देण्यात आली होती.  हिंगोली शहर सुंदर व स्वच्छ करण्या करीता त्यांनी हिररीनी सहभाग नोंदवून अनेक स्वयंसेवी संस्थाना सहभागी करून शहरामध्ये वृक्ष लागवडीवर अधिक भर दिला होता. त्याच प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर स्वच्छ भारत मिशन सुरू केले. ज्यामध्ये हिंगोली नगर पालिकेला देशपातळीवर व राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त झाला. त्याच प्रमाणे माझी वसुंधरा अंतर्गत राज्यस्तरावर चांगले काम केल्याबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

हिंगोली शहरामध्ये रस्ता प्रकल्प, जलकुंभ उभारणी त्याच प्रमाणे पुरातन कालिन भागात जलेश्वर तलावाच्या आजूबाजूला शेकडो नागरीकांनी केलेले अतिक्रमण हटवून जलेश्वर तलाव सौंदर्यीकरणावर अधिक लक्ष घातले होते. हिंगोली शहरामध्ये व्यापारी संकुल उभारून व्यवसायिकांसाठी मोलाचे योगदान केले होते. मागील तीन वर्षामध्ये प्रशासक म्हणुन त्यांनी कामकाज पाहीले. शहरातील नागरी सुविधांसोबत शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यावर त्यांनी अधिक भर दिला होता. 

महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत १७ जूनला नगर विकास विभागाने आदेश काढले. ज्यामध्ये अरविंद मुंढे यांची वाशिम नगर परिषद निलेश गायकवाड यांच्या रिक्त होणार्‍या पदावर बदली करण्यात आली आहे. वाशिम मुख्याधिकारी पदाचा पदभार अरविंद मुंढे हे १८ जून रोजी स्विकारणार आहेत.

Related to this topic: