Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

वारकरी अस्थी विसर्जन

परभणीत मृत्यूनंतर शेतात अस्थी विसर्जन करत लावले आंब्याचे झाड!

Shetkari Bones Immersed: रामभाऊ थिटे यांच्या अंत्यसंस्कारानंतर, कुटुंब पालकसेवा आणि पर्यावरण संवर्धनाची इच्छा पालन करून आंब्याचे झाड लावून अस्थी विसर्जन केले.


परभणीत मृत्यूनंतर शेतात अस्थी विसर्जन करत लावले आंब्याचे झाड

Shetkari Bones Immersed |

वारकरी वडिलांची शेवटची इच्छा
बाबुलतार येथे पालकसेवा, पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधनाचा संदेश

परभणी (Shetkari Bones Immersed) : पाथरी तालुक्यातील बाबुलतार येथील ज्येष्ठ वारकरी रमभाऊ थिटे उर्फ राम बाबा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पारंपरिक रूढी परंपरे ऐवजी पालकांची जिवंतपणी सेवा, पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचे जतन करा हा समाजाला प्रेरणा देणारा आदर्श उपक्रम राबविल्याने परिसरात आता  त्याची चर्चा होत आहे.  

रामभाऊ थिटे यांचे शनिवार २३ मे  रोजी निधन झाले होते. त्यानंतर २४ मे रोजी त्यांच्या इच्छेनुसार शेतामध्ये वारकरी परंपरेत अंत्यसंस्कार करण्यात आले. टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलाचे नामस्मरण करत अंत्ययात्रा काढण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात त्यांच्या पार्थिवाला अग्नी (Shetkari Bones Immersed) देण्यात आला. राम बाबा यांच्या आजारपणात त्यांचा मुलगा दशरथ थिटे यांनी घरामध्येच आयसीयू बेड व वैद्यकीय सुविधायुक्त खोली तयार करून शेवटपर्यंत वडिलांची सेवा केली. वृद्ध पालकांची जबाबदारी स्वीकारून त्यांना आवश्यक उपचार व काळजी देण्याचा संदेश त्यांच्या कृतीतून दिसून आला.

राम बाबा यांनी आपल्या अस्थी गंगेत विसर्जित (Shetkari Bones Immersed) न करता स्वतःच्या शेतात विसर्जित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार  सोमवार २५ मे रोजी कुटुंबीयांच्या हस्ते राख सावडण्याचा विधी करण्यात आला. त्यावेळी शेतामध्ये आंब्याचे झाड लावून त्याच ठिकाणी अस्थी व रक्षा विसर्जित करण्यात आली. धार्मिक विधींमधूनही पर्यावरण संवर्धनाचा विचार समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

दशरथ थिटे यांनी यावेळी बोलताना, आई-वडील जिवंत असताना त्यांची सेवा करणे हेच खरे कर्तव्य आहे. त्यांच्या आजारपणात दुर्लक्ष करून निधनानंतर मोठे कार्यक्रम करण्यापेक्षा तो खर्च त्यांच्या उपचारांवर आणि सेवेसाठी करावा, अशी भावना व्यक्त केली. त्याच भूमिकेतून त्यांनी वडिलांचे दिवस व तेरावे न घालण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Related to this topic: