Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वसमत दागिने चोरी

महिलेला भुरळ घालून अंगावरील दागिने लंपास

Vasmat Jewelry Theft: येथील बँक कॉलनी भागात एका साठ वर्षीय महिलेला फसवून तिच्या अंगावरील दागिने काढून घेण्याची घटना घडली बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडालेली आहे.


महिलेला भुरळ घालून अंगावरील दागिने लंपास

Vasmat Jewelry Theft |

वसमत (Vasmat Jewelry Theft) : येथील बँक कॉलनी भागात एका साठ वर्षीय महिलेला फसवून तिच्या अंगावरील दागिने काढून घेण्याची घटना घडली बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडालेली आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही मध्ये काय झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वसमत तालुक्यातील पारवा येथील रहिवाशी शांताबाई नामदेव कदम या महिला वसमत येथील श्रीनगर कॉलनी भागात राहतात बुधवारी दुपारच्या वेळी श्री स्वामी समर्थ मंदिराकडे जात असताना  त्यांना फसवून भुरळ घालून त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीची दागिने काढून देण्याचा प्रकार घडला आहे. 

सदर प्रकरणी (Vasmat Jewelry Theft) शांताबाई कदम यांनी गुरुवारी वसमत शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार  दोन अनोळखी तरुणांनी त्यांना रस्त्यावर पाकीट पडले आहे. असे सांगून त्यांना भुरळ घातली व अंगावरील चांदीचे ३० तोळे वजनाचे दंडकडे, कानातील सोन्याचे सहा ग्राम वजनाच्या काड्या काढून घेतले आहेत.  त्यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ पोलीस हवालदार शेख नय्यर त्यांच्यासह पोलीस कर्मचारी करत आहेत. या प्रकरणातील चोरटे आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांची ओळख पटवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत. लवकरच चोरटे जेरबंद होतील. असा विश्वास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी व्यक्त केला आहे.