Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Vishwas Nangre Patil

विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नागपूरातील पात्र पोलिसांना ड्युटीदरम्यान सर्व्हिस गन बाळगणे अनिवार्य

नागपूर शहरात पोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या आव्हानांचा विचार करून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय नागपूरातील पात्र पोलिसांना ड्युटीदरम्यान सर्व्हिस गन बाळगणे अनिवार्य

Vishwas Nangre Patil |

वाहतूक पोलिसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना आदेश; वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय

नागपूर शहरात पोलिसांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांच्या घटना आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या आव्हानांचा विचार करून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतूक पोलिसांसह सर्व पात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना अधिकृत सर्व्हिस गन, म्हणजेच पिस्तूल, सोबत बाळगणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश गुरुवार, १६ जुलै रोजी संपूर्ण पोलीस दलाला जारी करण्यात आले.

शहरातील नाकाबंदी, विशेष तपासणी मोहीम तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांना अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती, संशयित किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून विरोधाचा सामना करावा लागतो. काही प्रसंगी पोलिसांवर जीवघेणे हल्ले किंवा धक्काबुक्कीच्या घटनाही घडल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

याच पार्श्वभूमीवर, आत्मसंरक्षणासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता यावा, या उद्देशाने ड्युटीदरम्यान पोलिसांना लाठीसोबतच अधिकृत शस्त्रही बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कर्तव्य बजावताना पोलिसांची सुरक्षा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हा आदेश केवळ वाहतूक शाखेपुरता मर्यादित नसून नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनाही त्यांची अधिकृत सर्व्हिस रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तूल नेहमी सोबत ठेवण्याचे निर्देश दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले होते. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे आणि पोलीस दलाची कार्यक्षमता व सुरक्षितता वाढवणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना ड्युटीदरम्यान शिस्त, स्वच्छ गणवेश, नीटनेटके व्यक्तिमत्त्व आणि नागरिकांशी नम्र व सौजन्यपूर्ण वर्तन राखण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता सुरक्षेच्या दृष्टीने सर्व्हिस गन बाळगणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याने नागपूर पोलीस दलाच्या सज्जतेत आणखी भर पडणार आहे.

Related to this topic: