Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मुंबई

लग्नाच्या नकाराचा सूड! विरारमध्ये प्रियकराने केली दुहेरी हत्या, स्वतःवरही वार

विरार परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना उघडकीस आली असून, प्रियकराने प्रेयसीसह तिच्या आईची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.


लग्नाच्या नकाराचा सूड विरारमध्ये प्रियकराने केली दुहेरी हत्या स्वतःवरही वार

Virar Crime |

मुंबई (Virar Crime) : विरार परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना उघडकीस आली असून, प्रियकराने प्रेयसीसह तिच्या आईची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोपीने स्वतःचे जीवन संपवण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या प्रस्तावाला नकार मिळाल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

मृतांमध्ये नॅन्सी मिश्रा (वय २४) आणि तिची आई सरिता मिश्रा (वय ४५) यांचा समावेश असून, शिवम उपाध्याय असे आरोपीचे नाव आहे.

ही घटना आज, बुधवार (२९ एप्रिल) रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास विरार पश्चिम येथील पूणम आकांक्षा इमारत, न्यू विवा कॉलेजजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम आणि नॅन्सी यांच्यात मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मंगळवारी रात्री शिवम आपल्या नातेवाईकांसह मिश्रा कुटुंबाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेला होता. मात्र, नॅन्सी आणि तिची आई सरिता यांनी हा प्रस्ताव नाकारला.

या नकारामुळे संतप्त झालेल्या शिवमने बुधवारी पुन्हा त्या घरात प्रवेश केला. त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने नॅन्सी आणि तिच्या आईवर हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला.

यानंतर आरोपीने स्वतःलाही ब्लेडने जखमी करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, घरातून आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घरात दोघींचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आणि जखमी अवस्थेतील आरोपी पाहून तातडीने पोलिसांना माहिती दिली.

बोलिंज पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती ताब्यात घेतली. जखमी आरोपीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे विरार परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related to this topic: