Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मुंबई

विदर्भातील शाळा २२ जूनपासून; उष्णतेमुळे शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तारीख यापूर्वी १५ जून निश्चित करण्यात आली होती.


विदर्भातील शाळा २२ जूनपासून उष्णतेमुळे शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

Vidarbha School Reopening |

मुंबई (Vidarbha School Reopening) : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची तारीख यापूर्वी १५ जून निश्चित करण्यात आली होती. मात्र विदर्भात कायम असलेल्या तीव्र उष्णतेचा विचार करून शिक्षण विभागाने तेथील शाळांच्या प्रारंभाबाबत स्वतंत्र निर्णय घेतला आहे. आता विदर्भातील सर्व शाळा २२ जूनपासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांना आणखी एका आठवड्याची सुट्टी मिळणार आहे.

या निर्णयासंदर्भात शिक्षण संचालकालयाने विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांना आवश्यक आदेश जारी केले आहेत. शासनाच्या शालेय सुट्ट्यांबाबतच्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते आणि त्यानुसार तयारीही पूर्ण करण्यात आली होती.

मात्र विदर्भातील वाढते तापमान आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी व्यक्त होत असलेल्या चिंतेमुळे हा मुद्दा चर्चेत आला होता. याच विषयावर नागपूर खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेबरोबरच विद्यमान हवामान परिस्थितीचा विचार करून शिक्षण विभागाने विदर्भासाठी वेगळा निर्णय घेतला.

नवीन आदेशानुसार विदर्भ विभागातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाची सुरुवात सोमवार, २२ जूनपासून होईल. तसेच विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी २२ जून ते ३० जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १ जुलैनंतर मात्र शाळांचे कामकाज नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.

दरम्यान, विदर्भ वगळता राज्यातील इतर सर्व भागांमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १५ जूनपासूनच होणार असल्याचे शिक्षण संचालकालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया, पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच अध्यापनाचे नियोजन नियोजित वेळेनुसार सुरू राहणार आहे. विदर्भातील परिस्थिती लक्षात घेऊन तेथील शैक्षणिक वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.

शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी आणि शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महेश पालकर यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हा आदेश मंगळवारी रात्री जारी करण्यात आला.

Related to this topic: