ST Bus Stop: चामोर्शी तहसील कार्यालयाजवळ एसटी बस थांबा नसल्यामुळे वयोवृद्ध आणि निराधार नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांनी
चामोर्शी तहसील कार्यालयाजवळ थांबा सुरू करण्याची मागणी
घोट (ST Bus Stop) : संपूर्ण महाराष्ट्रातसह विदर्भात उन्हाळ्याच्या दाहकतेने सर्वसामान्याची लाई लाई होत असतांनाच चामोर्शी–गडचिरोली मार्गावरील चामोर्शी तहसील कार्यालयाजवळ एसटी बस थांबा नसल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयात विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी येथे अधिकृत बस थांबा सुरू करण्याची मागणी केली आहे.तहसील कार्यालय ते (ST Bus Stop) बस स्थानक यांदरम्यान सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतर आहे. सध्या एसटी बसेस फक्त बसस्थानकावरच प्रवाशांना उतरवत असल्याने नागरिकांना तहसील कार्यालयापर्यंत पायी जावे लागते. विशेषतः उन्हाळ्यात ही पायपीट अधिकच त्रासदायक ठरत असून वयोवृद्ध, महिला व आजारी व्यक्तींना याचा मोठा फटका बसत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, पूर्वी तहसील कार्यालयाजवळ बस थांबा (ST Bus Stop) होता. मात्र या ठिकाणी काही अपघातांच्या घटनां घडल्यामुळे चालकांकडून या ठिकाणी थांबण्यास टाळाटाळ केली जात आहे.परिणामी ज्येष्ठ नागरिक,विधवा महिला तसेच निराधार व्यक्तींना मोठ्या कसरतीने तहसील कार्यालय गाठावे लागते. अनेक नागरिकांकडे स्वतःचे वाहन नसल्याने ते पूर्णपणे एसटी सेवांवर अवलंबून आहेत.परंतु बस थेट तहसील कार्यालयाजवळ मार्गावर थांबत नसल्यामुळे त्यांना पायी चालत जावे लागते किंवा इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते.
याशिवाय, खाजगी वाहनेही या (ST Bus Stop) मार्गावर थांबण्यास नकार देत असल्याने समस्या अधिकच गंभीर झाली आहे. तहसील कार्यालयासमोर अधिकृत एसटी बस थांबा सुरू करून तात्काळ ज्येष्ठ नागरिक,महिला व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी तालुक्यातील सर्वस्तरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.