Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वसमत-परभणी अपघात

वसमत- परभणी मार्गावर भीषण अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू

Vasmat-Parbhani accident: वसमत-परभणी मार्गावर तेलगाव पाटीजवळ २२ एप्रिलला दोन युवकांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. दुचाकीवर बकराने उडी मारल्याने अपघात घडला.


वसमत- परभणी मार्गावर भीषण अपघात दोन युवकांचा जागीच मृत्यू

Vasmat-Parbhani accident |

हट्टा (Vasmat-Parbhani accident) : वसमत - परभणी मार्गावरील तेलगाव पाटीजवळ २२ एप्रिल गुरूवार रोजी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर (नांदुसा) येथील नितीन नागोराव नरवाडे व कपिल हीरामन हटकर हे दोघे परभणी येथील दर्गाह कंदुरीसाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यांच्या दुचाकीवर बकराही नेण्यात येत होता. दरम्यान, सकाळी सुमारे १०.३० ते ११.०० वाजण्याच्या सुमारास तेलगाव पाटीजवळ अचानक बकराने उडी मारल्याने चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला. याच वेळी समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीला जोरदार धडक बसली. या दुसर्‍या दुचाकीवर शेख सिराज शेख उमर, त्यांची पत्नी गौसियाबी व मुलगा शेख सुजात (रा. बऊर, ता. कळमनुरी) प्रवास करत होते.

या (Vasmat-Parbhani accident) भीषण अपघातात नितीन नागोराव नरवाडे (रा. नांदुसा, ता. अर्धापूर, जि. नांदेड) व शेख सिराज शेख उमर (रा. बऊर, ता. कळमनुरी) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कपिल हीरामन हटकर, गौसियाबी व शेख सुजात हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमत येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related to this topic: