Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वसमत गुन्हे दाखल

डीजे वाजवल्या प्रकरणी वसमतमध्ये गुन्हे दाखल

Wasmat crime filed: वसमतमध्ये श्रीराम नवमीच्या निमित्ताने दोन भव्य मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे नियम उल्लंघन केल्याने पाच जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.


डीजे वाजवल्या प्रकरणी वसमतमध्ये गुन्हे दाखल

Wasmat crime filed |

दोन प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

वसमत (Wasmat crime filed) : येथे श्रीराम नवमी निमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या मिरवणूकमध्ये डीजे लावून नियमाचे उल्लंघन करण्यात आले व आवाजाची मर्यादा ओलांडण्यात आली. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले म्हणून दोन  स्वतंत्र गुन्हे नोंदवून पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे मिरवणूक संपल्यानंतर डीजे वाल्यांनी डीजे घेऊन पोबारा केल्याने पोलिसांना डीजे वाल्यांचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

वसमत शहरात श्रीराम नवमी निमित्य दोन वेगवेगळ्या स्वतंत्र भव्य मिरवणूक काढण्यात आल्या होत्या. दोन्ही मिरवणुकांमध्ये प्रचंड मोठ्या आकाराचे (Wasmat crime filed) डीजे लावण्यात आले होते  दोन्ही डीजे चालकांनी मर्यादेपेक्षा जास्त आवाज वाढवण्याचे ध्वनीमापक यंत्रात नोंद झाली आहे/ त्यामुळे वसमत शहर पोलिसांनी दोन गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी  पोलीस हवालदार शामराव नथुराम गुव्हाडे यांनी दिली तक्रार आहे. यामध्ये गजानन भोकरे रा. वसमत , प्रशांत दगडे राहणार हिंगोली या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर दुसर्‍या प्रकरणात पोलीस  नाईक राजु लक्ष्मण गुठ्ठे यांच्या  तक्रारीवरून सुरज रावसाहेब फेगडे रा. बहीर्जीनगर वसमत ,संतोष उर्फ बाबा गणपत अफुने रा. काळीपेठ वसमत, साई पतंगे राहणार वसमत या तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यामध्ये संगणमत करून मर्यादेपेक्षा आवाज वाढवला पोलिसांनी आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही डीजे कर्णकर्कश आवाज मर्यादेपेक्षा जास्त वाढवून ध्वनी प्रदूषण केले व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केले असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. मिरवणूक संपल्यानंतर आरोपी गर्दीचा फायदा घेऊन डीजे घेऊन निघून गेले असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे त्यामुळे आता आरोपी व डीजे चा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, उपनिरीक्षक कसबेवाड करत आहेत.

Related to this topic: