Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

वसंतराव नाईक तांडा भ्रष्टाचार

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना निधीमधील सोलर हायमस्ट लाईट बसविण्याच्या कामात कोटींचा भ्रष्ट्राचार

Solar Light Corruption: वसंतराव नाईक तांडा योजना अंतर्गत सोलर हायमस्ट लाईट बसवण्याच्या कामात कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे, मुख्य अभियंता यांच्या कडे तक्रार दाखल.


वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना निधीमधील सोलर हायमस्ट लाईट बसविण्याच्या कामात कोटींचा भ्रष्ट्राचार

Solar Light Corruption |

सा. बां. प्रादेशिक विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता याजकडे तक्रार

मानोरा (Solar Light Corruption) : वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत वाशिम जिल्हयातील एकूण २० गावामध्ये सोलर हायमस्ट लाईट बसविणे या कामाकरीता शासनाकडून अंदाजे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या विद्युत कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ( स्थापत्य ) वाशीम हे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता प्रदान करू शकत नाही. तरी सुध्दा सा. बां. ( स्थापत्य ) विभाग, कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांनी सा. बां. विद्युत विभाग, यवतमाळ यांच्याशी कोणतेही पत्रव्यवहार न करता आणि तांत्रिक मान्यता न घेता स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून कामे मंजूर करत अनियमितता करण्यात आलेल्या कामाचे देयके अदा केले आहे.

तसेच स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबवता जीएम पोर्टलचा वापर करून एकाच अमरावती येथील सिटी लिंट या खाजगी कंपनीला कामे दिली आहे. इतर पात्र ठेकेदारांना संधी न देता ठराविक कंपनीला अनुचित लाभ मिळवून दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग ( स्थापत्य ) वाशिमचे शुभम जोशी यांनी लाखो रुपयांचा (Solar Light Corruption) भ्रष्ट्राचार केला आहे. सदरील शासकीय प्रकरणात विभागीय समितीची नेमणूक करून केलेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, असे तक्रार निवेदन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता यांना प्रकाश नामदेवराव राठोड यांनी पाठविले आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वाशिम जिल्हयातील २० गावामध्ये सोलर हायमस्ट लाईट बसविणे या कामाकरीता तांडा सुधार योजनेअंतर्गत सन २०२३ - २४ शासन निर्णय क्र. तांसुयो २०२४ / प्र. क्र. ३०९ दि. १९ मार्च रोजी २०२४ परिपत्रकानुसार शासनाकडून अंदाजे २ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. विद्युत कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ( स्थापत्य ) वाशीम हे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता प्रदान करू शकत नाही. तरी सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाचे ( स्थापत्य ) कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांनी अधिकृत तांत्रीक मान्यता प्रदान करणाऱ्या सा. बां. विद्युत विभाग यवतमाळ यांच्याशी कोणतेही पत्रव्यवहार न करता आणि तांत्रिक मान्यता न घेता स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून कामे मंजूर करत कामाचे देयके अदा केले आहे.

तसेच स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया न राबवता जीएम पोर्टलचा वापर करून एकाच अमरावती येथील सिटी लिंट या खाजगी कंपनीला कामे दिली आहे. इतर पात्र ठेकेदारांना संधी न देता ठराविक कंपनीला अनुचित लाभ मिळवून दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) वाशिमचे शुभम जोशी यांनी लाखो रुपयाचा (Solar Light Corruption) भ्रष्ट्राचार केला आहे. तसेच सा. बां. विभाग वाशीम यांच्याकडे कोणताही विद्युत विभागाचा अभियंता किंवा तांत्रिक बाबीचा कुशल कर्मचारी नसतांना त्यांनी सोलर हायमस्ट लाईटची कामे केलेली आहे. यामुळे सबंधित गावातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नियमबाहय प्राकलन, तांत्रिक मंजुरी शिवाय कामाचे आदेश, स्पर्धारहित पद्धतीने ठेका देणे व शासनाची दिशाभूल करून सार्वजनिक निधीचा गैरवापर होणे, ही बाब विभागाच्या प्रतिमेला धक्का देणारी असुन यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. कामासंदर्भातील सर्व नोंदी एम बी बुक, बिल, देयक, जी एम पोर्टल कागदपत्रे, व सबंधित फाईल यांची बारकाईने तपासणी करण्यात यावी, तसेच सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करण्यात यावा. सदरील संपूर्ण प्रकरणाची विभागीय स्तरावर सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करत दोषी आढळल्यास कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीचे तक्रार निवेदन प्रादेशिक विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता यांना प्रकाश राठोड यांनी दिले आहे. 

Related to this topic: