Foreign liquor seized: वसमत शहरातील एका घरातून छाप्यातून जप्त झालेला 18,000 रु. मूल्याचा विदेशी दारूचा साठा अवैध विक्रेत्यांनी भोळगी वसंतीतही कनाळले आहे.
वसमत शहर पोलिसांच्या छाप्यात विदेशी दारू जप्त
वसमत (Foreign liquor seized) : वसमत शहर व तालुक्यात अवैधदारू विक्रेत्यांनी कहर केला आहे आता तर गल्लोगल्ली भरवस्तीतही अवैध दारू विक्रीसाठा होत असल्याचे समोर आले आहे वसमत शहर पोलिसांनी शहर पेठ भागात मारलेल्या छाप्यात एका घरातून विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे अवैध दारू विक्रेत्यांना दारू पुरवठा करणारे रॅकेट यामागे असल्याचा प्रकारही समोर येत आहे.
अवैध दारू विक्री विरोधात लहान मोठ्या कारवाया होतात मात्र त्याचा परिणाम होत नाही कारवाया सुरू आणि दारू विक्री सुरू असाही प्रकार वसमत तालुक्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गतआहे त्यातून दारू विक्रेत्यांचे हिम्मत वाढलेली आहे भरवस्तीतही अवैध दारू विक्री केंद्र आहेत आता तर नागरी वस्तीत दारू साठापोलिसां कडून जप्त झाला आहे त्यावरून दारूचा विषय किती गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे.
वसमत शहर पोलिसांना शहरातील शहर पेठ भागातील एका घरात मोठ्या प्रमाणात दारू साठा केला असल्याची माहिती मिळाली त्यावरून वसमत शहर पोलिसांनी शहर पेठ भागातील एका घरात छापा मारला असता रॉयल स्टॅग इम्पेरियल ब्ल्यू सारख्या विदेशी दारूचा साठा सापडला तब्बल 18 हजार रुपयांची दारू येथे पोलिसांनी जप्त केली आहे याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख समी शेख समद यांच्या तक्रारीवरून सुरेश विठ्ठलराव म्यानेवार राहणार वसमत याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे या छाप्याने वसमत शहर पोलीस यंत्रणाही हादरली आहे कारण भर वस्तीत दारू विक्री केंद्र चालवण्यासाठी अवैध दारू साठा जमा झाला होता येथून ग्रामीण भागात दारू पुरवठा होत असल्याचीही चर्चा आहे सापडलेली दारू असली आहे का नकली आहे यावरून आता चर्चेला उधान आले आहे.
टेक्निकल केसेसमुळे दारू विक्री वाढली
वसमत शहर व तालुक्यात असलेल्या पोलीस ठाणे अंतर्गत अवैध दारू विरोधात नेहमी कारवाया होतात मात्र आठ बॉटल दहा बॉटल जप्त दाखवली जाते प्रत्यक्षात प्रचंड प्रमाणात अवैध दारू विक्री आहे ज्याच्या विरोधात कारवाई झाली तो लगेच पुन्हा तेथेच अवैध दारू विक्री करतो पुढच्या वेळेस केस मागितली की फंटर च्या नावावर केस दिली जाते टेक्निकल केसेसमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांची हिंमत वाढत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे वसमत शहरात भर वस्तीत पोलिसांनी छापा मारला असला तरी येथे गेल्या कित्येक वर्षापासून अवैध दारू विक्री व पुरवठा रॅकेट चालते आजवर याकडे दुर्लक्ष का झाले याचा शोध घेण्याची गरज आहे.