Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण विभागाच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर झळकला हिंगोलीच्या संशोधक पुष्यमित्र जोशी यांचा शोधनिबंध

जिल्ह्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त संशोधक पुष्यमित्र जोशी यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल मिळाली आहे.


अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण विभागाच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर झळकला हिंगोलीच्या संशोधक पुष्यमित्र जोशी यांचा शोधनिबंध

USEPA Research |

हिंगोली (USEPA Research) : जिल्ह्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त संशोधक पुष्यमित्र जोशी यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल मिळाली आहे. अमेरिकेन सरकारची पर्यावरण संरक्षण संस्था United States Environmental Protection Agency च्या अधिकृत संशोधन प्लॅटफॉर्मवर पुष्यमित्र जोशी यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

USEPA ही अमेरिकन सरकारची पर्यावरण संस्था असून, हवा, पाणी, जमीन आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी काम करते. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण, सुरक्षित पिण्याचे पाणी, हवामान बदल, औद्योगिक प्रदूषण, पर्यावरणीय नियम आणि शाश्वत विकास यांसारख्या विषयांवर ही संस्था संशोधन, धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करते. जगभरातील संशोधक आणि धोरण अभ्यासक USEPA च्या संशोधनाचा संदर्भ घेतात. त्याच अधिकृत प्लॅटफॉर्मवर पुष्यमित्र जोशीचा शोधनिबंध झळकलेला पाहणे ही त्यांच्या कार्याची मोठी आंतरराष्ट्रीय दखल मानली जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी पुष्यमित्राच्या पाण्यातील फ्लुराईडचे प्रमाण कमी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅक्वामित्र’ या अभिनव सोल्युशनला भारत सरकारकडून तिसरे पेटंट प्राप्त झाले होते. भारतातील २३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण अधिक असल्यामुळे दात, हाडे आणि इतर अनेक गंभीर आजार निर्माण होतात. या समस्येवर कमी खर्चात आणि कोणत्याही उर्जेशिवाय उपाय देणारे ‘अ‍ॅक्वामित्र’ या संशोधनास गेल्या काही दिवसांपूर्वीच पेटंट मिळाले होते तर त्याआधी पुष्यमित्र यांच्या ‘डिस्पोजमित्र’ आणि ‘मोल्युस्क कॅचर’ या संशोधनांनाही पेटंट मिळालेले  आहे. ‘डिस्पोजमित्र’ हे उपकरण जैववैद्यकीय कचऱ्याचे पर्यावरणपूरक पद्धतीने विघटन करते, तर ‘मोल्युस्क कॅचर’ हे मासेमारी व्यवसायासाठी उपयुक्त तंत्रज्ञान मानले जाते.

पुष्यमित्र जोशी यांनी दोन वेळा BRICS आंतरराष्ट्रीय संघटनेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वर्षी भारताच्या संसदेत त्यांना देशातील सर्वोच्च युवा सन्मानांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. संशोधक, नवोपक्रमकर्ता, लेखक आणि धोरण सल्लागार म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

कोविड-१९ काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वपूर्ण कार्य केले. ‘डिस्पोजमित्र’च्या साहाय्याने वापरलेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावण्यात मदत केली, तर सॅनिटायझरची कमतरता असताना स्वतः सॅनिटायझर तयार करून गरजूंपर्यंत मोफत पोहोचवले. रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे ‘इम्युनो बूस्टर’ तयार करून हजारो लोकांना विनामूल्य वितरित केले होते.

विज्ञान, पर्यावरण आणि जीवनशास्त्र विषयांवरील त्यांनी लिहिलेली तीन शैक्षणिक पुस्तके विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यांच्या २० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर्सचे विविध प्रतिष्ठित जर्नल्समध्ये प्रकाशन झाले असून, ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवरील लेखनालाही मोठी दाद मिळाली आहे. G20 जागृती यात्रेतील ‘बिझ ज्ञान ट्री’ स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळवले असून, ‘युथ आयकॉन’ पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून त्यांना ‘अविष्कार’ संशोधन फेलोशिपही प्रदान करण्यात आली आहे.

हिंगोलीसारख्या जिल्ह्यातून जागतिक संशोधन क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या पुष्यमित्र जोशी यांच्या या यशामुळे युवा संशोधकांना नवी प्रेरणा मिळत आहे. हिंगोलीसारख्या जिल्ह्यातील एका युवकाच्या संशोधनाला अमेरिकन सरकारी संस्थेच्या अधिकृत व्यासपीठावर स्थान मिळणे ही अत्यंत दुर्मिळ बाब मानली जात असून, संपूर्ण जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरत आहे.

Related to this topic: