Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

जिल्ह्यात मार्च महिन्यात बहुतांश तालुक्यात अवेळी पावसासह गारपीट व वादळी वार्‍यामुळे शेतीपिकांचे व मालमत्तेचे आणि घरांचे टिनपत्रे उडुन नुकसान झाल्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.


अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

Unseasonal Rain |

यवतमाळ (Unseasonal Rain) : जिल्ह्यात मार्च महिन्यात बहुतांश तालुक्यात अवेळी पावसासह गारपीट व वादळी वार्‍यामुळे शेतीपिकांचे व मालमत्तेचे आणि घरांचे टिनपत्रे उडुन नुकसान झाल्याच्या घटनांची नोंद झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे.

संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, नुकसान झालेल्या क्षेत्राचे अ, ब, क, ड या निकषांनुसार निधी मागणी प्रस्ताव तयार करून तात्काळ सादर करावे. घरांसारख्या मालमत्तेच्या नुकसानीसाठीही स्वतंत्र पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसिलदारांना दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार दारव्हा तालुक्यांत अवेळी पावसामुळे शेतीपिके नजर अंदाजे ४२ हेक्टर वरील गहु, तिळ, ज्वारी या शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची व बाभुळगांव तालुक्यात दोन हेक्टर वरील ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. तसेच वणी तालुक्यांत वादळी वार्‍यामुळे एका घराची अंशत; पडझड, पुसद तालुक्यात एका मोठ्या पशुधनाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. या सर्व नुकसानग्रस्त क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Related to this topic: