Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड

बुलढाणा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील महत्त्वाच्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड

Unopposed Election |

उत्साहपूर्ण वातावरणात निवड प्रक्रिया पार; संचालक मंडळाची उपस्थिती, समर्थकांकडून जल्लोष

चिखली (Unopposed Election) : बुलढाणा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील महत्त्वाच्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवड प्रक्रियेत समाधान सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरीगृहात झालेल्या निवड प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी कामकाज पाहिले. यावेळी दोन संचालक वगळता सर्व संचालक उपस्थित होते. पक्षश्रेष्ठींकडून सभापतीपदासाठी समाधान सुपेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यांच्या उमेदवारीचे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते.

अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर कोणत्याही अन्य उमेदवाराचा अर्ज शिल्लक न राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र घोंगे यांनी समाधान सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

घोषणा होताच बाजार समिती परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समर्थक व कार्यकर्त्यांनी समाधान सुपेकर यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केला तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची निवड झाल्याने शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समिती कार्यक्षेत्रातील घटकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सभापती निवडीवेळी धोंडगे श्रीकिसन तेजराव, थुट्टे गणेश पुंजाजी, पवार परमेश्वर सखाराम, मिसाळ श्रीकृष्ण सुभाष, भुतेकर पांडुरंग बाजीराव, वाकडे संतोष शिवाजी, समाधान गोविंदा सुपेकर, कमल विष्णु कुळसुंदर, मंदाबाई शेनफड भुतेकर, जाधव रामेश्वर श्रीपत, वानखेडे संतोष रमेश, खेडेकर रामेश्वर शिवशंकर, लाहुडकर मनोज सारंगधर, परिहार समाधान सुखदेव, गवई संजय सुखदेव व पवार राजेश गजानन उपस्थित होते.

Related to this topic: