Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भाजपा उमेश नागरे

जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनवर भाजपाचे उमेश नागरे यांची बिनविरोध निवड

BJP Umesh Nagre: हिंगोलीच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड


जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनवर भाजपाचे उमेश नागरे यांची बिनविरोध निवड

BJP Umesh Nagre |

हिंगोली (BJP Umesh Nagre) : जिल्हा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे फेडरेशन मर्यादित, हिंगोलीच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडी बद्दल आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात  भाजपा प्रदेश कार्यालयीन सहमंत्री भाऊराव देशमुख यांच्या हस्ते नागरे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,जिल्हा प्रवक्ता विलास गोरे,उपसभापती निखील बांगर,जिल्हा उपाध्यक्ष संतोष टेकाळे,गणेश शिंदे,संदीप वाकडे,विनायक महाराज,संतोष साबळे उपस्थित होते.जिल्ह्यातील स्वयंरोजगार क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या बळकटीकरणाला अधिक गती मिळावी यासाठी तसेच सभासदांचे प्रलंबित प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी ते सकारात्मक व प्रभावीपणे काम करणार असल्याचे नागरे यांनी  यावेळी सांगितले.

नागरे (BJP Umesh Nagre) यांच्या या निवडीबद्दल खासदार रामराव वडकुते, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव,माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे,बाबाराव बांगर यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related to this topic: