Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी रेशन काळाबाजार

परभणीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार; तांदूळ जप्त...!

Parbhani Ration Black Marketing: पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीत राशनच्या तांदळाचा अवैधरित्या साठा करून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या तांदळावर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा


परभणीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार तांदूळ जप्त

Parbhani Ration Black Marketing |

 

श्रेया ट्रेडिंग कंपनीवर स्थागुशाची धाड ५० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त..!

परभणी (Parbhani Ration Black Marketing) : पोलीस स्टेशन कोतवाली हद्दीत राशनच्या तांदळाचा अवैधरित्या साठा करून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेल्या तांदळावर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ४९ कट्टे तांदूळ, एकूण वजन २५ क्विंटल ३५ किलो व अंदाजे ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल रमेश राठी वय २८ रा. परसावत नगर याने त्याच्या श्रेया ट्रेडिंग कंपनी या दुकानामध्ये शासकीय राशनचा तांदूळ अवैधरित्या साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून तपासणी केली असता दुकानामध्ये ४९ कट्टे तांदूळ आढळून आला.

सदर तांदूळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री (Parbhani Ration Black Marketing) करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचा संशय असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कोतवाली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक परिहार, पोह रंजीत आगळे, रवी जाधव, सूर्यकांत फड, बुकरे, काळे, पोकॉ. निलेश परसोडे व दीपक मुदीराज यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात शासकीय धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलीस व पुरवठा विभागाकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अशा प्रकारच्या गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे राशन धान्याच्या अवैध साठेबाजी व काळाबाजार करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.