Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली नगर परिषद

महावितरणच्या पॉवर हाऊस शेजारी जनावरांच्या हाडांचे अवशेष; बजरंग दल व विहिंपकडून कत्तलखाना उघडकीस!

Hingoli Municipal Council: महावितरणच्यावरून जाणणाऱ्या शेड मध्ये जनावरांच्या हाडांनी भरलेल्या अवशेष राहुली शिवारात दिसू लागले. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कर्तऱ्यांनी पोलिसांना माहिती


महावितरणच्या पॉवर हाऊस शेजारी जनावरांच्या हाडांचे अवशेष बजरंग दल व विहिंपकडून कत्तलखाना उघडकीस

Hingoli Municipal Council |

हिंगोली (Hingoli Municipal Council) : एमआयडीसी परिसरालगत असलेल्या नगर परिषदेच्या कचरा डम्पिंग यार्डजवळ, राहुली शिवारातील महावितरण पॉवर हाऊसच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये जनावरांचे सांगाडे आणि हाडांचा मोठा साठा उघडकीस आला आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला असून, यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, राहुली शिवारातील (Hingoli Municipal Council) महावितरणच्या पॉवर हाऊसच्या कंपाउंड वॉलला लागूनच एका पत्राच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची हाडे आणि अवशेष साठवून ठेवण्यात आले होते. या ठिकाणी जनावरांची अवैध कत्तल करून, मांस विक्री केल्यानंतर उरलेले अवशेष गोळा केले जात असल्याचा संशय आहे. घटनास्थळावरील कुजलेल्या हाडांवरून आणि तेथून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीवरून हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून अविरतपणे सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

​गोवंशाची कत्तल केल्याचा आरोप; आंदोलक आक्रमक
​घटनास्थळी आढळलेले अवशेष हे गायींचे (गोवंश) असल्याचा थेट आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. "हा प्रकार अत्यंत निंदनीय असून यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा बेकायदेशीर कत्तलखाना तात्काळ आणि कायमचा बंद करण्यात यावा," अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. तसेच, या काळ्या कृत्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेऊन संबंधित जागामालक आणि कत्तलखाना चालवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

​पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
बजरंग दल आणि विहिंपच्या कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आता हे अवशेष नेमके कोणत्या जनावरांचे आहेत, हे प्रयोगशाळेच्या तपासणीनंतर (फॉरेन्सिक रिपोर्ट) स्पष्ट होईल. मात्र, शहराच्या वेशीवर चालणाऱ्या या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि दोषींवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यावेळी बजरंग दल सह संयोजक प्रवीण चव्हाण, गौरक्षक  कुष्णा जगताप, विशाल यादव, दशरथ पवार, नागेश गायकवाड व राहुल ग्रामस्थ उपस्थित होते.