Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

उष्मघात बळी

बोरी (राणी) शेतात इसमाचा उष्मघाताने बळी

Heat Stroke Victim: या तपत्या उन्हाळयात सुर्य आग ओकत असुन बोरी (राणी) शेत शिवारात एक अनोळखी इसम तीन दिवसापासुन भटकत राणी (बोरी) शेतातील एका शेताच्या धानाच्या गोडाऊन जवळ विश्रांती


बोरी राणी शेतात इसमाचा उष्मघाताने बळी

Heat Stroke Victim |

कन्हान (Heat Stroke Victim) : या तपत्या उन्हाळयात सुर्य आग ओकत असुन बोरी (राणी) शेत शिवारात एक अनोळखी इसम तीन दिवसापासुन भटकत राणी (बोरी) शेतातील एका शेताच्या धानाच्या गोडाऊन जवळ विश्रांती करित असताना उष्मघाताने मुत्यु झालेल्या इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 
             
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी (राणी) येथे तीन दिवसापासुन एक अनोळखी इसम भटकता नी नागरिकाना दिसत होता. शनिवार (दि.६) जुन ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान बोरी (राणी) शेत शिवारातील सचिन काळे रा. कांद्री यांचे बोरडा ते बोरी (राणी) रोड वरिल शेतातील धानाच्या गोडाऊन जवळ बाहेर बसण्याकरिता असलेल्या सिमेंट ओटयावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने (Heat Stroke Victim) परिसरात चांगलीच खळबळ उडाली. बोरी (राणी) चे पोलीस पाटील संदीप नेऊल याना माहिती मिळताच त्यानी कन्हान पोलीस स्टेशन ला कळविले असता कन्हान पोलीसानी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून सामा जिक कार्यकर्ता तथा पोलीस मित्र अनिल आंबिलढुके यास बोलावुन त्याचे चारचाकी वाहन टाटा एस क्र. एमएच ४० सी एम ७४२७ या वाहनाने उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे शवविच्छेदन करिता ठेवण्यात आला.

बोरी (राणी) येथिल पोलीस पाटील संदीप नेऊल यास शुक्रवार (दि.५) ला हा इसम दिसला असता त्यास गावात आणुन चाय बिस्किट चारून विचारले असता त्याने आपले नाव अमोल सहारे असे सांगितले . त्याचे जवळ कुठलेही कागदपत्र नसल्याने तो कुठला आहे कळु शकले नाही. हा इसम भटकत असताना त्याच्या पोटात अन्न व पाणी पुरेशे नसल्याने सावली च्या आश्रयाने विश्रांती घेताना उष्मघाताने त्याचा मुत्य झाल्याचे बोलल्या जात आहे. या (Heat Stroke Victim) अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळुन आले असुन त्याचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष, उंची १७० सेमी असुन अंगात नारंगी फिक्कट रंगाची हाफ टी शर्ट असुन काळ्या रंगाचा फुल पॅन्ट घातलेला आहे. सदर इसमाचे पोस्टमार्टम कामी उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे ठेवण्यात आले असुन वरील वर्णनाचा इसम कोणाला माहित असल्यास पोलीस स्टेशन कन्हान येथे संपर्क करून कळवावे. 

Related to this topic: