Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

अपघात अनोळखी मृतक

सोशल मीडिया माध्यमातून अपघातातील अनोळखी मयताची ओळख पटली

Accident Unidentified Death: कळमनुरीतून रस्त्यावर अज्ञात वाहनेतील चोकीत ठार झालेल्या अनोळख्या मृताचा नातेवाईकांना सासुरवाडीमध्ये सोशल मीडिया मार्गाने ओळखले गेले.


सोशल मीडिया माध्यमातून अपघातातील अनोळखी मयताची ओळख पटली

Accident Unidentified Death |

 

मयत नांदेड जिल्ह्यातील 

आखाडा बाळापूर (Accident Unidentified Death) : कळमनुरी तालुक्यातील महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम जागीच ठार झाला होता सदर मयताची ओळख चौवीस तासांच्या आत पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शना खाली सोशल मीडिया माध्यमातून पोलीसांनी पटवून आज मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २४ जून  अडीच वाजण्याच्या पुर्वी महामार्गावर डोंगरगाव पूल शिवारात कयाधू नदी पाण्यावरील पूलाच्या  समोर कळमनुरीकडे जाणारे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक अनोळखी इसम जागीच ठार झाला होता.या अनोळखी इसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिस निरीक्षक शरद मरे, पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख राजेश घोंगडे,सागर वाढोणकर, पिराजी बेले पोलिस पथकाने परीसरात गावात माहिती देण्याबरोबरच वाटसफ ग्रुपमध्ये फोटो माहिती टाकली होती सदर वाटसफ ग्रूप फोटो माहिती मयत यांच्या सासुरवाडीतील नरवाडी येथील नातेवाईक यांनी बघून तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला व ओळख पटली सदर मयत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथील धारबा बाबुराव खंदारे असल्याचे स्पष्ट झाले अस बिट प्रमुख राजेश घोंगडे  यांनी सांगितले.

सोशल मीडिया माध्यमातून अपघातातील अनोळखी मयताची ओळख काही तासांतच पटली आहे.सोशल मिडिया फेसबुक,वाटसफ, इंस्टाग्राम माध्यमातून सदुपयोग घेतला तर तो उपयुक्त ठरतो.