Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > पुणे

Union Cabinet Expansion

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; पार्थ पवारांना कॅबिनेट मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार लॉबिंग

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा आहे.


केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पार्थ पवारांना कॅबिनेट मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार लॉबिंग

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार निंबाजी आहेर यांचे पक्ष नेतृत्वाला पत्र; पार्थ पवार यांच्या नावाची शिफारस

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा आहे. खासदार पार्थ पवार यांना केंद्रात संधी मिळावी, यासाठी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षांनी अधिकृतरित्या पत्र लिहून त्यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उदयकुमार निंबाजी आहेर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना उद्देशून १३ जुलै २०२६ रोजी पत्र पाठवले आहे. या पत्रात खासदार पार्थ पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वगुणांचा आणि पक्षासाठी असलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांना केंद्रात संधी देण्याची विनंती करण्यात आली आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेतृत्वाचे प्रभावी प्रतिनिधित्व करणारे नेते असून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास पक्षाचा विस्तार देशभर अधिक प्रभावीपणे होऊ शकतो. त्यांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पक्षाची पोहोच वाढण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

उदयकुमार निंबाजी आहेर यांनी या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पार्थ पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्याची विनंती करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे.

पार्थ पवार यांच्या बाजूने मांडलेल्या मुद्द्यांमध्ये त्यांची तरुण आणि अभ्यासू प्रतिमा, हिंदी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व, लंडनमधील उच्च शिक्षण तसेच राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटन मजबूत करण्याची क्षमता यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. तसेच देशभरातील युवकांशी प्रभावी संवाद साधण्याची त्यांची क्षमता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरू शकते, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी विविध पक्षांकडून संभाव्य मंत्रिपदासाठी सुरू असलेल्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत पार्थ पवार यांच्या नावाची झालेली शिफारस आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत महत्त्वाची मानली जात आहे.

Related to this topic: