Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

उद्धव ठाकरे

27 जूनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंगोलीत

Uddhav Thackeray: शिवसेनेची उद्धव ठाकरे हिंगोलीत रात्र 8 वाजता परभणीला पोहोचणाऱ्या कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळी सांधळ्या 10.30 वाजून सुरुवात करत असतील.


27 जूनला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंगोलीत

Uddhav Thackeray |

हिंगोली (Uddhav Thackeray) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याला शुक्रवार, 26 जून 2026 पासून सुरुवात होत आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर हा दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्या सहा लोकसभा मतदारसंघांना उद्धव ठाकरे स्वतः भेटी देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बंड पुकारल्याने उद्धव ठाकरे येत्या शनिवारी, 27 जून रोजी हिंगोलीत दाखल होत आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दौऱ्याची सुरुवात शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून नागपूर विमानाने होणार असून त्यानंतर वाहनाने ते यवतमाळ येथे मुक्कामी पोहोचतील. शनिवार, 27 जून रोजी सकाळी 10.30 वाजता यवतमाळ, दुपारी 2.00 वाजता वाशिम येथे कार्यक्रम घेतल्यानंतर सायंकाळी 4.00 वाजता ते हिंगोलीत दाखल होतील. हिंगोलीतील कार्यक्रमास आमदार अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, अजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हिंगोलीतील कार्यक्रमानंतर रात्री 8.00 वाजता ते परभणीकडे मुक्कामासाठी रवाना होतील.

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ‘ऑपरेशन टायगर’मध्ये बंडखोरी केल्यानंतर मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः हिंगोलीत येऊन शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या दौऱ्यातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बंडखोरांना थेट आव्हान देणार असून, निष्ठावंत शिवसैनिकांना बळ देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.