Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

गोंडखैरी टोल नाक्याजवळ कंटेनरमध्ये ट्रक चालकाचा मृतदेह

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी टोल नाका परिसरात गुरुवारी सकाळी एका कंटेनरमध्ये ट्रक चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.


गोंडखैरी टोल नाक्याजवळ कंटेनरमध्ये ट्रक चालकाचा मृतदेह

Truck Driver Death Case |

सहचालक नसल्याने मदत मिळाली नाही का?कळमेश्वर पोलिसांचा तपास सुरू

कळमेश्वर (Truck Driver Death Case) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी टोल नाका परिसरात गुरुवारी सकाळी एका कंटेनरमध्ये ट्रक चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ट्रक क्रमांक HR 69 D 8056 रस्त्याच्या कडेला उभा असताना ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास स्थानिकांना कंटेनरमध्ये चालक बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. याची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय मनोज शेंडे, अंमलदार मनीष सोनवणे व राम नेहारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक मंगेश गमे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मंगेश गमे यांच्या ॲम्बुलन्सच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे शवविच्छेदनासाठी रवाना केले.

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा मालवाहू ट्रक चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत चालक ट्रकमध्ये एकटाच प्रवास करत होता. ट्रकमध्ये सहचालक किंवा कंडक्टर असता तर वेळेत मदत मिळून चालकाचा जीव वाचू शकला असता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान अनेक चालक झोपेचा अभाव, सततचा ताण, थकवा व अचानक प्रकृती बिघाड अशा समस्यांना सामोरे जात असतात. अशा परिस्थितीत चालक एकटाच असल्यास आपत्कालीन मदत मिळण्यास विलंब होतो, हे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले आहे.

सदर मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा प्रकार अपघाती आहे की प्रकृती बिघाडामुळे झाला, अथवा अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. कळमेश्वर पोलीस निरीक्षक मनोज जी. काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.