Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Traffic Rules

रिसोड पोलिसांचा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक इशारा; अवैध प्रवासी वाहतूक आणि पार्किंग करणाऱ्यांची खैर नाही!

स्थानिक पोलीस स्टेशन येथे काळी-पिवळी टॅक्सी, लक्झरी वाहने, ऑटो रिक्षा, खाजगी वाहने, मालवाहू ट्रक आणि स्कूल बसचे चालक व मालक यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.


रिसोड पोलिसांचा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक इशारा अवैध प्रवासी वाहतूक आणि पार्किंग करणाऱ्यांची खैर नाही

Traffic Rules |

पीआय रामेश्वर चव्हाण यांचे वाहनधारकांना कडक निर्देश

रिसोड :  स्थानिक पोलीस स्टेशन येथे काळी-पिवळी टॅक्सी, लक्झरी वाहने, ऑटो रिक्षा, खाजगी वाहने, मालवाहू ट्रक आणि स्कूल बसचे चालक व मालक यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत रस्ता सुरक्षा आणि अपघात नियंत्रणाबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा रिसोडचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी दिला.

गेल्या दोन दिवसांपासून रिसोड शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, ही अवैध वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याच्या सक्त सूचना वाहनधारकांना देण्यात आल्या आहेत.

वाहन चालक व मालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • प्रत्येक वाहनाचे इंजिन, टायर व इतर भाग सुस्थितीत असावेत. परिवहन विभागाकडून (RTO) वैध फिटनेस प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
  • वाहन चालकाकडे अद्ययावत ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक (RC Book) आणि विमा (Insurance) कागदपत्रे असणे आवश्यक असून ती वाहनात सोबत ठेवावीत.
  • चालकाच्या समोरील सीटवर अतिरिक्त प्रवासी बसवू नयेत.
  • वाहनाचा वेग ५० ते ६० किमी प्रतितासपेक्षा जास्त नसावा.
  • १ जुलैपासून शाळा व महाविद्यालये सुरू होत असल्याने स्कूल बस किंवा खाजगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये. तसेच, नातेवाईकांशिवाय अल्पवयीन मुलांना एकटे घेऊन जाऊ नये.
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक व मालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांचे परवाने (Licence/Permit) रद्द करण्याची कारवाई केली जाईल.

बस स्थानक व लोणी फाटा परिसरातील बेशिस्तीवर कारवाई

रिसोड शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. दररोज रात्री रिसोड बसस्थानकासमोरून पुणे व नाशिककडे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसेस अनधिकृतपणे व बेशिस्तपणे प्रवासी भरत असल्याने इतर वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच, लोणी फाटा ते मालेगाव नाका या राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रक उभे केले जात असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. महामार्ग व राज्य मार्गावर होणाऱ्या या अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी पोलीस व वाहतूक विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: