Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > पुणे

Toxic Liquor

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; १५ लाख लिटर विषारी दारू निर्मितीचा कट उधळला, हजारो लिटर केमिकल जप्त

पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी धडक कारवाई करत विषारी दारू निर्मितीचा मोठा कट उधळून लावला आहे.


पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई १५ लाख लिटर विषारी दारू निर्मितीचा कट उधळला हजारो लिटर केमिकल जप्त

कुरकुंभ येथील कारखान्यावर छापा; ३४२० किलो कोरल हायड्रेट, ५८०० लिटर रॉ केमिकल आणि सुमारे १ कोटींची यंत्रसामग्री जप्त

पुणे : पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी धडक कारवाई करत विषारी दारू निर्मितीचा मोठा कट उधळून लावला आहे. या कारवाईदरम्यान तब्बल ३४२० किलो कोरल हायड्रेट आणि ते तयार करण्यासाठी वापरले जाणारे ५८०० लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आले. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या रसायनांपासून अंदाजे १५ लाख लिटर विषारी दारू तयार केली जाऊ शकली असती. या कारवाईची राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ परिसरातील एका कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान तेथे ३४२० किलो वजनाचा फिकट पिवळ्या-पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा संशयित पदार्थ तसेच त्याच्या निर्मितीसाठी लागणारे ५८०० लिटर रॉ केमिकल आढळून आले. तपासात हा कारखाना किशोर दत्तात्रय सुर्वे यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाच्या तपासात किशोर दत्तात्रय सुर्वे, शैलेश विठ्ठल ठाकुर, नबी सरवर जमीर सिद्दीकी आणि आदेश विठ्ठल पाचांगणे हे अवैध कारखाना चालवत असल्याचे समोर आले आहे. तसेच जप्त करण्यात आलेले रासायनिक पदार्थ शैलेश विठ्ठल ठाकुर यांनी तयार केल्याचेही तपासातून स्पष्ट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

छाप्यामध्ये संशयित रसायनांसोबतच मेफेड्रॉन (Mephedrone) या अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी सेंट्रीफ्युगल मशीन आणि GLR मशीन देखील जप्त करण्यात आली. या दोन्ही यंत्रसामग्रीची अंदाजे किंमत १ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेल्या संशयित पदार्थाची तपासणी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा (एफएसएल), पुणे येथे करण्यात आली. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, त्या पदार्थामध्ये प्रतिबंधित कोरल हायड्रेट (Chloral Hydrate) हे रसायन असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे रसायन विषारी दारू तयार करण्यासाठी वापरले जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

तपास यंत्रणांच्या अंदाजानुसार, जप्त करण्यात आलेल्या ३४२० किलो कोरल हायड्रेटपासून सुमारे १५ लाख लिटर विषारी दारू तयार होऊ शकली असती. त्यामुळे या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आणि जीवघेण्या दारूच्या उत्पादनाला आळा बसल्याचे मानले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास संबंधित यंत्रणा करत आहेत.

Related to this topic: