Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीचे सत्र; राहेर येथील शेतकरी हवालदिल

पातुर तालुक्यातील राहेर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.


पातुर तालुक्यात विहिरीवरील मोटार चोरीचे सत्र राहेर येथील शेतकरी हवालदिल

Theft Cases |

चान्नी पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांचे निवेदन; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

पातुर (Theft Cases) : पातुर तालुक्यातील राहेर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी चान्नी पोलिसांनी कडक पावले उचलावीत, या मागणीसाठी युवा सामाजिक कार्यकर्ते आशिष गुलाबराव पाचपोर यांनी चान्नी पोलीस स्टेशन येथे लेखी निवेदन दिले आहे.

नेमका प्रकार काय?

राहेर शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी, केबल आणि स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. शेतकरी रात्री घरी गेल्यानंतर चोरटे संधी साधून महागड्या साहित्याची चोरी करत आहेत. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना, आता या चोरीच्या सत्रामुळे त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवले आहे. एका मोटार पंप संचाची किंमत २० ते ३० हजार रुपयांच्या घरात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या:

आशिष गुलाबराव पाचपोर यांनी दिलेल्या निवेदनात खालील बाबींवर प्रकाश टाकला आहे :


 * रात्रीची गस्त वाढवा: राहेर आणि परिसरातील शेतशिवारात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी.
 * चोरट्यांचा शोध घ्या: वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमागे एखादी टोळी सक्रिय असण्याची शक्यता असून त्यांचा तातडीने शोध घ्यावा.
 * शेतकऱ्यांना संरक्षण: रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची वेळ असताना मोटार चोरीला गेल्यामुळे पिके सुकण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घ्यावे.
  "शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून पीक उभे करतो, मात्र चोरटे काही तासांतच शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे साहित्य चोरून नेत आहेत. यामुळे राहेर परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. पोलिसांनी तातडीने यावर कारवाईकरून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

यावेळी गावातील इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता चान्नी पोलीस या प्रकरणावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: