Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीत चोरट्यांनी फोडली दोन घरे; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

गंगाखेड शहरातील रजा कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार, २० मे रोजी सकाळी उघडकीस आली.


परभणीत चोरट्यांनी फोडली दोन घरे सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

Theft Case |

शहरातील रजा कॉलनीतील घटना; ग्राम सुरक्षा दल तसेच मोहल्ला समिती सक्रिय करण्याची मागणी

परभणी (Theft Case) : गंगाखेड शहरातील रजा कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार, २० मे रोजी सकाळी उघडकीस आली. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांची संख्या वाढविण्याबरोबरच ग्राम सुरक्षा दल तसेच मोहल्ला समिती सक्रिय करण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरातील रजा कॉलनी येथील रहिवासी सय्यद मोईज सय्यद गौस यांचे कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. मंगळवार, १९ मे रोजी रात्री ११ वाजेपासून ते बुधवार, २० मे रोजी पहाटे २ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी लोखंडी गजाच्या सहाय्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉकर फोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकण्यात आले.

चोरट्यांनी अंदाजे २४ तोळे चांदीचे कडे, वाळे, २ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ तसेच स्वयंपाकघरातील डब्यात ठेवलेली अंदाजे १ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.

याच गल्लीत राहणाऱ्या निर्मला प्रकाश पाटेकर यांच्या घरी राहत असलेले त्यांचे आई-वडील लक्ष्मीबाई कोंडीबा नारायणकर व कोंडीबा नारायणकर हे घराला कुलूप लावून मुलाकडे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेली १० तोळे वजनाची चांदीची साखळी, १ ग्रॅम सोन्याचे मनी, राजा-राणी मंगळसूत्र (२ ग्रॅम) तसेच १ लाख रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.

रजा कॉलनी परिसरात दोन घरे फोडल्याची माहिती मिळताच बिट अंमलदार शंकर रेंगे व श्रीकांत डोंगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

गंगाखेड शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस ठाण्यातील पोलिसांची संख्या वाढविण्याबरोबरच ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल आणि शहरात मोहल्ला समिती सक्रिय करण्याची गरज निर्माण झाल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

Related to this topic: