Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > पुणे

The Haus Commune

पुण्यातील पबवर पहाटे ३ वाजता गुन्हे शाखेची धाड; १०० तरुण-तरुणींना घेतले ताब्यात

पुणे शहरातील विमानतळ परिसरातील प्रसिद्ध ‘द हौज कम्युन’ (The Haus Commune) या पबवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे अचानक कारवाई केली.


पुण्यातील पबवर पहाटे ३ वाजता गुन्हे शाखेची धाड १०० तरुण-तरुणींना घेतले ताब्यात

The Haus Commune |

रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी असतानाही ‘द हौज कम्युन’मध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरू; पबचालक-व्यवस्थापकाविरोधात गुन्ह्याची प्रक्रिया

पुणे : पुणे शहरातील विमानतळ परिसरातील प्रसिद्ध ‘द हौज कम्युन’ (The Haus Commune) या पबवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे अचानक कारवाई केली. प्रशासनाने पब सुरू ठेवण्यासाठी रात्री दीड वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली असतानाही, संबंधित पबमध्ये पहाटे तीन वाजेपर्यंत पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.

गुन्हे शाखेला विमानतळ परिसरातील या पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून निर्धारित वेळेनंतरही पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी रविवारी पहाटे सुमारे तीन वाजता पबवर छापा टाकला.

कारवाईदरम्यान पबमधील डान्स फ्लोअरवर मोठ्या संख्येने तरुण-तरुणी उपस्थित असल्याचे पोलिसांना आढळून आले. सुमारे ८० ते १०० तरुण-तरुणी डीजेच्या तालावर नाचत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, पब सुरू ठेवण्याची अधिकृत मुदत रात्री दीड वाजेपर्यंत असताना तो पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू कसा होता, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात पबचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तसेच, पबमध्ये मद्यविक्रीसाठी अधिकृत परवाना होता की नाही, याचीही चौकशी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत पब सुरू ठेवण्यामागे नेमके कोणाचे पाठबळ होते, याचाही तपास पोलिसांकडून केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Related to this topic: