Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

माहूर गडावर भाविक महिलेची पर्स चोरी

रेणुका माता मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या एका भाविक महिलेची पर्स चोरी झाल्याची घटना दि. १८ रोजी सकाळच्या सुमारास घडली.


माहूर गडावर भाविक महिलेची पर्स चोरी

Temple Theft |

रोकड, सोन्याचे दागिने असा सुमारे १ लाख ५९ हजारांचा ऐवज लंपास

माहूर (Temple Theft) : रेणुका माता मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या एका भाविक महिलेची पर्स चोरी झाल्याची घटना दि. १८ रोजी सकाळच्या सुमारास घडली. या चोरीत रोकड, सोन्याच्या अंगठ्या व चांदीचे दागिने असा एकूण सुमारे १ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची फिर्याद मुंबई, डोंबिवली येथील भाविक महिला उषा तायडे यांनी माहूर पोलिसात दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भाविक महिला उषा तायडे या मुलगी सीमा अशोक पाटील व इतर नातेवाईकांसह पहाटे ४:३० वाजता माहूर येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. खासगी रूममध्ये मुक्कामाची व्यवस्था करून सकाळी पायी चालत रेणुका मातेच्या दर्शनासाठी गडावर गेल्या. महिलेच्या पर्समध्ये ५७ हजार रुपये रोख, ५ ग्रॅम व ६ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच १० ग्रॅम चांदीचे जोडवे ठेवले होते.

सकाळी सुमारे ७:३० वाजता श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी मंदिरात रांगेत उभे असताना संबंधित महिलेच्या लक्षात आले की, त्यांच्या डाव्या बाजूस असलेली पर्स गायब झाली आहे. त्यानंतर त्यांनी तातडीने मंदिराबाहेर येऊन सुरक्षा रक्षक महादेव मुंडे यांना माहिती दिली.

सुरक्षा रक्षकांनी तत्काळ मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, फिकट निळ्या रंगाची साडी परिधान केलेली एक महिला पर्स चोरताना आणि मंदिराबाहेर नेताना दिसून आल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी माहूर पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जाधव करीत आहेत. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेतला जात आहे.

Related to this topic: