Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

घातक ऑनलाइन संच मान्यता त्वरित दुरुस्त करा! 'संच मान्यता काळा ड्राफ्ट रद्द करा' राज्यव्यापी निषेध आंदोलन

ऑनलाइन संच मान्यतेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.


घातक ऑनलाइन संच मान्यता त्वरित दुरुस्त करा संच मान्यता काळा ड्राफ्ट रद्द करा राज्यव्यापी निषेध आंदोलन

Teachers Protest June 1 2026 |

नागपूर (Teachers Protest June 1 2026) : कनिष्ठ महाविद्यालयांच्या ऑनलाइन संच मान्यतेतील कथित त्रुटींविरोधात आणि "संच मान्यता काळा ड्राफ्ट रद्द करा" या मागणीसाठी सोमवार (१ जून) रोजी राज्यभर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांसमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. ऑनलाइन संच मान्यतेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनवर प्रसिद्ध करण्यात आलेली ऑनलाइन संच मान्यता ही विद्यमान शासन निर्णय, परिपत्रके आणि प्रचलित निकषांना डावलून तयार करण्यात आल्याचा दावा विज्युक्टा आणि राज्य महासंघाने केला आहे. या प्रक्रियेमुळे अनेक शिक्षक अतिरिक्त, अर्धवेळ किंवा सीएचबी (Clock Hour Basis) होण्याच्या संकटात सापडल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. तसेच अनेक कनिष्ठ महाविद्यालये आणि तुकड्यांच्या अनुदानावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या मुद्द्यावर गेल्या वर्षभरात शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाशी अनेक स्तरांवर चर्चा केली. पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिक्षक प्रतिनिधींची बैठकही झाली होती. त्या बैठकीत प्रचलित निकषांनुसार संच मान्यता करण्याबाबत सहमती झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे. मात्र प्रत्यक्ष ऑनलाइन संच मान्यतेत ती भूमिका दिसून न आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिक्षक संघटनांच्या मते, हा प्रश्न केवळ संच मान्यतेपुरता मर्यादित नसून शिक्षकांच्या रोजगाराचा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे अन्यायकारक निर्णय मागे घेण्यासाठी शिक्षकांनी संघटितपणे आंदोलनात सहभागी होण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यभर होणाऱ्या या आंदोलनात शिक्षक, पदाधिकारी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विज्युक्टा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.