Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Teachers Additional Workload

शिक्षकांवरील अतिरिक्त कामे कमी करा; जीर्ण शाळांची तातडीने दुरुस्ती करा

मुख मागण्यांसाठी युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.


शिक्षकांवरील अतिरिक्त कामे कमी करा जीर्ण शाळांची तातडीने दुरुस्ती करा

युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन; मागण्यांवर निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चिखली : शिक्षकांवरील अतिरिक्त शासकीय कामांचा बोजा तातडीने कमी करून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा, तसेच जीर्ण व नादुरुस्त शाळा इमारतींची जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्ती करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे, शहर संघटक प्रीतमभाई गैची आणि शहरप्रमुख आनंद गैची यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकांवर विविध शासकीय योजना, सर्वेक्षणे आणि प्रशासकीय कामांचा वाढता भार टाकला जात असल्याने त्यांचे शाळा आणि विद्यार्थ्यांकडे अपेक्षित लक्ष राहत नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असून शाळेतील शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांवरील देखरेख कमी होत आहे. याचाच गैरफायदा घेऊन काही विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जात असल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि शिक्षकांचा सातत्यपूर्ण सहवास मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात अशा इमारतींमध्ये शिक्षण घेणे अधिक धोकादायक ठरत असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांना अध्यापनासाठी आवश्यक वेळ, विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण आणि शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे युवासेनेने स्पष्ट केले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी युवासेनेच्या वतीने तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, शहरप्रमुख श्रीरामभाऊ झारे, शहर संघटक प्रीतमभाई गैची, उपजिल्हाप्रमुख अशोक राजपूत, शहरप्रमुख तथा युवानेते आनंद गैची, शिवसेना नेते लालसिंग मोरे, सखाराम पाटील, उपतालुकाप्रमुख राहुल मिसाळ, हरीभाऊ इंगळे, छगनराव वानखेडे, राहुल मिसाळ, निवृत्ती घुबे, शुभम वानखेडे, मदनराजे आकाळ, उपशहरप्रमुख समाधान जाधव, रवीअप्पा पेठकर, पुंजाजी शेळके, अनिल जावरे, सोहेल शहा, किसानसेना तालुकाप्रमुख नारायण वाणी, अशोकराव मोहिते, दिनकर मोरे, गजानन डुकरे, लक्ष्मण इंगळे, राजू इंगळे, अंकुश इंगळे, संजय कदम, प्रदीप सपकाळ, गजानन फोलाने, दत्ता मेंद, कृष्णा फोलाने, गौतम गवई, संजय सोळंकी, सिद्धेश्वर सोळंकी, सोपान भालेकर, सुरज असोलकर, किशोर महाले, इम्रान शेख, अशोकराव भोसले, मालोजी गुजर, डॉ. प्रकाश काळे, सुपडाजी कोऱ्हाळे, गजानन काकडे, सचिन जोशी, सिद्धेश्वर ठेंग, वैभव ठेंग, प्रदीप गरुड, वसंतराव चौरे, रामदास जाधव, अंकुश डहाके, राजू लोखंडे, शिवाजी पंडित, गणेश वाघमारे, समाधान गायकवाड, कैलास गायकवाड, प्रल्हाद पवार, गजानन शेळके, समाधान पाटील, मंगेश मोळवंडे, तुषार वजगडे यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related to this topic: