Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

काळ्याफिती आंदोलन

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काळ्याफिती आंदोलनास सुरुवात

Black Ribbon Andolan: महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काळ्याफिती आंदोलनास सुरुवात

Black Ribbon Andolan |

 

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शासनाविरोधात इशारा

नांदेड (Black Ribbon Andolan) : महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला आजपासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे सुरुवात करण्यात आली. विद्यापीठातील विविध कर्मचारी संघटनांनी काळ्याफिती लावून कामकाज करत शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढावेत, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

महाराष्ट्रातील राज्य सार्वजनिक विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक मूलभूत व दीर्घकालीन प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करूनही शासन स्तरावर अपेक्षित निर्णय होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

प्रमुख मागण्यांमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० व ३० वर्षांनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना लागू करणे, उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, २००५ पूर्वी जाहिरात प्रक्रिया पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे रजारोखीकरण अंतिम वेतनाच्या आधारे अदा करणे, रिक्त शिक्षकेतर पदभरतीस मंजुरी देणे, तसेच प्रयोगशाळा सहाय्यक व परिचरांना पूर्ववत लाभ सुरू करणे या मागण्यांचा समावेश आहे. तसेच नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांतील मुख्य लिपिक व वरिष्ठ लिपिक पदावरील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढणे, न्यायप्रविष्ट नसलेल्या महाविद्यालयांतील प्रयोगशाळा सहाय्यकांची सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती करणे, पदोन्नतीचे प्रमाण ५०:५० ऐवजी ८०:२० करण्यास मान्यता देणे तसेच बंद करण्यात आलेली डीसीपीएस वर्गणी कपात पुन्हा सुरू करणे या मागण्याही करण्यात आल्या आहेत.

आंदोलनाच्या पुढील टप्प्यांमध्ये १८ ते २० मे दरम्यान दुपारच्या सुट्टीत धरणे, निषेध सभा व घोषणाबाजी, २५ मे रोजी राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन, २९ मे रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने निर्णय न घेतल्यास १ जून रोजी लाक्षणिक कामबंद आंदोलन तर ८ जून २०२६ पासून बेमुदत संप आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा कृती समितीने दिला आहे. या (Black Ribbon Andolan) आंदोलनात विद्यापीठातील अधिकारी फोरम, विद्यापीठ कर्मचारी संघ, मागासवर्गीय कर्मचारी संघटना,विद्यापीठ कर्मचारी संघटना तसेच विद्यापीठ कर्मचारी फंड संघटना आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला असून शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.