Superstition Eradication Samiti: हाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारे लक्षवेधी पुरस्कार याही वर्षी जाहीर करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातून महाराष्ट्र अंधश्रद्धा
उत्तरेश्वर बिराजदार, अनिल दरेकर, दशरथ भिसे, प्राचार्य विजयकुमार पाटील, बळीराम भुक्तरे, आरमान सय्यद यांचा समावेश
लातूर (Superstition Eradication Samiti) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारे लक्षवेधी पुरस्कार याही वर्षी जाहीर करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार, राज्य कार्यवाह विविध उपक्रम अनिल दरेकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे, जिल्हा प्रधानसचिव प्रा. डॉ.बळीराम भुक्तरे, उदगीर शाखा कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील, युवा कार्यकर्ता आरमान इम्रान सय्यद तसेच लातूर शहर शाखा व उदगीर शाखेला लक्षवेधी पुरस्कार जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार दिनांक 05/06/07 जून 2026 रोजी अहिल्यानगर येथे संपन्न होणाऱ्या राज्य कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
उत्तरेश्वर बिराजदार हे राज्याचे सरचिटणीस असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Superstition Eradication Samiti) स्थापनेपासूनचे कार्यकर्ते आहेत, खऱ्या अर्थाने लातूरमध्ये अनिसचे रोपटे रोवण्याचे काम उत्तरेश्वर बिराजदार यांनीच केलेले आहे. गेली 30 ते 35 वर्षे महा.अंनिसच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन संघटनेने त्यांना यावर्षीचा लक्षवेधी पुरस्कार देऊन गौरविण्याचे ठरवले आहे. अनिल दरेकर लातूर जिल्ह्याचे माजी कार्याध्यक्ष व सध्या राज्य कार्यवाह विविध उपक्रम म्हणून अत्यंत यशस्वी पणे काम करत आहेत त्याची दखल घेऊन समितीने यावर्षीचा लक्षवेधी पुरस्कार त्यांना देण्याचे ठरवले आहे. सध्या कार्यरत असलेले लातूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्रा. दशरथ भिसे यांच्याही कामाची दखल घेऊन समितीने त्यांनाही लक्षवेधी पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. लातूर जिल्ह्याचे प्रधान सचिव प्रा.बळीराम भुक्तरे व उदगीर शाखेचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी उदगीर शाखा लीड शाखा म्हणून पुढे आणलेली आहे, त्यांचाही समितीने लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्याचे ठरवले आहे.
सध्या कार्यरत असलेल्या राज्य प्रधान सचिव रुकसाना मुल्ला यांचा मुलगा आरमान इम्रान सय्यद हा लातूर शाखेचा युवा कार्यकर्ता असून त्यानेही लातूर शाखेच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे व सोच या युवा छावणीमध्ये यशस्वी सहभाग नोंदवल्यामुळे समितीने (Superstition Eradication Samiti) त्यालाही लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. कार्यकर्त्यांबरोबरच काही शाखांनाही उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लक्षवेधी शाखा पुरस्कार दिला जातो. लातूर जिल्ह्यात लातूर शहर शाखा व उदगीर शाखा या दोन शाखेंना लक्षवेधी शाखा पुरस्कार प्राप्त झालेला महा.अंनिसच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांचे व शहर शाखा लातूर आणि उदगीर शाखेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.