Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

हर्षवर्धन सपकाळ निषेध

परभणीत हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन

Harshvardhan Sapkal's protest: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विषयी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने जोडे मारो आंदोलन


परभणीत हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन

Harshvardhan Sapkal's protest |

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विषयी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध

परभणी (Harshvardhan Sapkal's protest) : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत बुधवार ५ ऑगस्ट रोजी परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उद्देशून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal's protest) यांनी एक्स पोस्टद्वारे टिप्पणी केली. या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. महिलांविषयी वापरण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेचा विरोध करत बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन केले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनाला जि.प. उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, संतोष देशमुख, भावनाताई नखाते, नंदाताई राठोड, रोहन सामाले, एम.आर. सरोदे, दिपक वारकरी, शेख अहेमद, अक्षय देशमुख, अनिल गोरे, रामदास दळवे, प्रमोद भांगे, रवि चव्हाण, महेश चव्हाण, पांडूरंग टेकाळे, मुमताज शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: