Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Suicide Case

धरणगाव येथे २९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे २९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.


धरणगाव येथे २९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide Case |

धरणगाव (ता. मलकापूर): मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे २९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम राजेंद्र नेरकर (वय २९, रा. धरणगाव) यांनी धरमाय परिसरातील एका विहिरीजवळ जाऊन तेथील लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने संबंधितांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या घटनेमुळे धरणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

टीप: आत्महत्येच्या घटनांबाबत जबाबदारीने वृत्तांकन करणे आवश्यक आहे. आपण किंवा आपल्या परिचयातील कोणी मानसिक तणावात असेल, तर विश्वासू व्यक्तीशी संवाद साधा किंवा तातडीने मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या.

Related to this topic: