Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान: वरखेडच्या सुपुत्र डॉ. आकाश भगत यांचा शाळेकडून गौरव

आपल्या मूळ शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत केलेल्या या सन्मानामुळे गावासह शाळेची मान उंचावली आहे.


ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान वरखेडच्या सुपुत्र डॉ आकाश भगत यांचा शाळेकडून गौरव

Student Achievement |

चिखली (Student Achievement) : तालुक्यातील वरखेड येथील ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळे’चा माजी विद्यार्थी तथा त्वचाविकार तज्ज्ञ (MBBS, MD Dermatology) डॉ. आकाश किशोर भगत यांचा २१एप्रिल२०२६ रोजी शाळेच्या वतीने नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या मूळ शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत केलेल्या या सन्मानामुळे गावासह शाळेची मान उंचावली आहे.

डॉ. भगत यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात याच शाळेतून केली. पुढे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एमडी (डर्माटोलॉजी) पदवी संपादन केली. आपल्या यशाचे श्रेय देताना ते म्हणाले, “माझ्या यशाचा पाया या शाळेतच रचला गेला. ग्रामीण भागात राहूनही मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मला इथूनच मिळाली. ही शाळा माझ्यासाठी मंदिरासारखी आहे.”

सत्काराला उत्तर देताना त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “शिक्षक आजही विद्यार्थ्यांसाठी मनापासून मेहनत घेत आहेत. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. या शाळेतून भविष्यात आणखी मोठे डॉक्टर, अधिकारी घडतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश भगत, मुख्याध्यापक शरद बंगाळे, शिक्षकवृंद तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या गावातील विद्यार्थी उच्च पदावर पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, उपस्थितांनी डॉ. भगत यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related to this topic: