Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Special Intensive Revision

मतदारांनी विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा; आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आमदार श्वेता महाले यांचे आवाहन

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – SIR) अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघात मतदार पडताळणीची प्रक्रिया सुरू होत आहे.


मतदारांनी विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आमदार श्वेता महाले यांचे आवाहन

चिखली : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision – SIR) अंतर्गत चिखली विधानसभा मतदारसंघात मतदार पडताळणीची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी सर्व मतदारांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत प्रत्येक गावात व परिसरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून SIR फॉर्मचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मोहिमेसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र (Voter ID), चालू मोबाईल क्रमांक आणि दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. विशेषतः पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत फोटो उपलब्ध नसल्यास ते तातडीने काढून ठेवावेत, जेणेकरून फॉर्म भरताना कोणताही विलंब होणार नाही.

आमदार श्वेता महाले यांनी सांगितले की, मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोग ही विशेष मोहीम राबवत आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने BLO यांना सहकार्य करून आवश्यक माहिती वेळेत द्यावी. तसेच आपल्या कुटुंबातील आणि शेजारील मतदारांपर्यंतही ही माहिती पोहोचवून त्यांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.

लोकशाही अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी या विशेष पुनरीक्षण मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक कागदपत्रांसह सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार श्वेता महाले यांनी केले आहे.

Related to this topic: