Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

सौर ऊर्जेवरील पाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू


सौर ऊर्जेवरील पाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू

Solar Water Project |

दोन वर्षांपासून नळ कोरडेठण्ण, महिलांचा मटका फोड आंदोलनाचा ईशारा

धानोरा (Solar Water Project) : स्थानीक नगरपंचायत तर्फे विद्यानगर वार्डामध्ये सौर योजनेवर आधारित दुहेरी लघु नळ पाणीपुरवठा योजना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२३- २४ प्रभाग क्रमांक एक मध्ये कोरमय्या कुर्मीलीवार यांचे घराजवळील हात पंपावर सौर उर्जेवर पाण्याची टाकी लावणार होती. परंतु त्या ठिकाणी पाणी न लागल्यामुळे विद्यानगर मधील अंगणवाडी जवळ येथे सौर उर्जेवर चालणारी पाण्याची टाकी बसविण्यात आली. परंतु त्या टाकी पासून लावलेल्या नळाला एकदाही पाणी आले नसल्याने ती  शोभेची वास्तु झाली आहे. या संदर्भात  विद्यानगर वार्डातील महिलांनी  मुख्याधिकारी यांना दिनांक २५ मार्च  रोजी निवेदन सादर करून मटकाफोड आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.

नगरपंचायत मार्फत सौर उर्जेवर चालणारी पाण्याची टाकी अंगणवाडीला लागून उभारण्यात आली आहे. परंतू जेव्हा पासून सौर उर्जेवर पाण्याची टाकी लावली त्या दिवशी नळाला पाणी आले, मात्र त्यानंतर पाणी टाकीत भरत असल्याचा आवाज येतो तसेच पाण्याची टाकी ओव्हर फ्लो सुद्धा होते पण नळाला मात्र पाणी येत नाही. यामुळे नागरीकांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ही बाब अनेक वेळा संबंधीत कर्मचारांच्या  निदर्शनास आणून दिली असतांनाही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. शासनाच्या निधीतून उभारेली ही योजना निक्रीय अवस्थेत पडून असून नागरीकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नाही. या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन सौर उर्जेवर चालणार्‍या पाण्याच्या टाकीची पाहणी करून सात दिवसाच्या आत नळाला नियमीत पाणी पुरवठा सुरू करावा,अन्यथा विद्यानगर वार्डातील महिला व नागरीक नगरपंचायत कार्यालयासमोर मडका फोड आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी अर्चना करमनकर, शीतल कुंभारे ,सीमा हलामी उपस्थित होत्या.या निवेदनावर वार्डातील महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

Related to this topic: