Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

SIR Campaign

परभणीतील गंगाखेड उपविभाग मराठवाड्यात अव्वल; एसआयआर अंतर्गत ७०.२९ टक्के संगणकीकरण पूर्ण

शनिवार, १८ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत उपविभागाने ७०.२९ टक्के संगणकीकरण (डिजिटायझेशन) पूर्ण केले.


परभणीतील गंगाखेड उपविभाग मराठवाड्यात अव्वल एसआयआर अंतर्गत ७०२९ टक्के संगणकीकरण पूर्ण

परभणीतील गंगाखेड उपविभाग मराठवाड्यात अव्वल; एसआयआर अंतर्गत ७०.२९ टक्के संगणकीकरण पूर्ण

 

भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड उपविभागाने संगणकीकरणाच्या कामात उल्लेखनीय यश मिळवत मराठवाड्यातील सर्व उपविभागांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. शनिवार, १८ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत उपविभागाने ७०.२९ टक्के संगणकीकरण (डिजिटायझेशन) पूर्ण केले.

राज्यभर सुरू असलेल्या एसआयआर अभियानात गंगाखेड उपविभागाने नियोजनबद्ध कार्यपद्धती, प्रभावी समन्वय आणि क्षेत्रीय यंत्रणेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर ही कामगिरी साध्य केली आहे. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उषाकिरण श्रुंगारे, नायब तहसीलदार अशोकराव केंद्रे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, गटशिक्षणाधिकारी शशिकांत मुंढे, तालुका कृषी अधिकारी मारोती शेंडगे, उपअभियंता अरविंद बामणीकर, सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम मोडके तसेच पालम व पूर्णा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पार पडले.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील ४३२ मतदान केंद्र भागांमध्ये प्रशिक्षित बीएलओ (BLO) अधिकाऱ्यांनी एकूण ४,१७,४८१ मतदारांपैकी ४,१२,८८८ (९८.९० टक्के) मतदारांना फॉर्मचे वितरण केले आहे. यापैकी २,९३,४४४ मतदारांचे (७०.२९ टक्के) संगणकीकरण पूर्ण करण्यात आले असून, या कामगिरीमुळे गंगाखेड उपविभाग मराठवाड्यात तसेच उपविभागीय स्तरावर अव्वल ठरला आहे.

जिल्हा प्रशासनाने केली प्रशंसा

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी जिवराज डापकर यांच्या प्रभावी नेतृत्व, सातत्यपूर्ण आढावा, काटेकोर नियोजन आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी समन्वयामुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड, पालम व पूर्णा येथील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी अत्यंत वेगाने व अचूकतेने संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा प्रशासनाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत उर्वरित कामही याच गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गंगाखेड तालुक्यात एसआयआर अभियानाला वेग

गंगाखेड तालुक्यातील तलाठी दररोज सकाळी ८ वाजता आपल्या सज्जातील गावांना भेट देत बीएलओंना ईएफ अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे संकलित करणे, संगणकीकरण करणे तसेच प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करत आहेत. तलाठी, बीएलओ आणि स्थानिक नागरिक यांच्या प्रभावी समन्वयामुळे एसआयआर अभियानाला अधिक गती मिळाली असून गंगाखेड तालुका उपविभाग सातत्याने प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे.

Related to this topic: