Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

वाकल बिबट्या जेरबंद

वाकलमध्ये एका महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

Vakal leopard captured: वाकल व परिसरात राहणारे बिबट्या महिन्यापासून नागरिकांना धमक्यावर ठेवत असल्यासारखे काम करीत असे. वन विभागाने हा बिबट्या जेरबंद करण्याच्या यश आले.


वाकलमध्ये एका महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

Vakal leopard captured |

 

सिंदेवाही वनविभागाची धडक कारवाई

सिंदेवाही (Vakal leopard captured) : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रात येत असलेल्या वाकल गाव व परिसरात गेल्या एका महिन्यापासून सतत दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सोमवारी सकाळी हा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला. या यशस्वी कारवाईमुळे वाकल आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

गेल्या महिन्याभरापासून या बिबट्याने वाकल गाव व लगतच्या शिवारात धुमाकूळ घातला होता. रात्रीच्या वेळी गावात शिरून बिबट्या शेळ्या, बकऱ्या आणि कोंबड्यांवर ताव मारत असल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत होते. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक कमालीच्या दहशतीखाली वावरत होते. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले होते.

या समस्येचे गांभीर्य ओळखून सिंदेवाही वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पावले उचलली. बिबट्याचा वावर असलेल्या संभाव्य ठिकाणी रणनीती आखून पिंजरा लावण्यात आला. वनविभागाच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर सोमवारी सकाळी यश आले आणि बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी वाकलबंद वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून वनविभागाच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया वनविभागाकडून सुरू आहे.